मुंबई | पुण्यामध्ये कोयता गॅंगची दशहत निर्माण झाली आहे. या कोयता गॅंगनं काही तरूणांवर हल्लादेखील केला होता. त्यामुळं सध्या पुणेकर चिंतेत आहेत. परंतु आता पुण्यातील या घटनेची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी घेतली आहे.
कोयता हातात घेऊन कोणी दादागिरी केली तर त्याला ठोकणार, त्यांना सोडणार नाही, असा इशाराच आता फडणवीसांनी या कोयता गॅंगला दिला आहे.
कोयता गॅंग वगैरे काही नाही, काहीजण फक्त हिरोगिरी करत आहे. आता या गॅंगला सरळ करू आणि ठोकून काढू. याबाबतचे आदेश पोलिसांना दिले आहेत, असंही फडणवीस म्हणाले.
‘कोयता गॅंग’ हा शब्द न वापरता त्याऐवजी ‘धारदार शस्र’ असा शब्द वापरा, असे आदेश सरकारने दिले आहेत, अशा जोरदार चर्चा रंगल्या होत्या. पण आता या चर्चांणा फडणवीसांनी फेटाळून लावले आहे. असे कोणताही आदेश सरकारकडून काढण्यात आलेला नाही, असं फडणवीसांनी सांगितले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही(Ajit Pawar) पुण्यातील या कोयता गॅंगची दखल घेतली होती. त्यांनी हा मुद्दा विधीमंडळात मांडला होता. गुन्हेगारांवर प्रशासनाचा वचक राहिला नाही, अशी टीकाही पवारांनी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
- उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायची घाई केली नाहीतर…,छगन भुजबळांचा मोठा दावा
- स्टॅनने रचला इतिहास! ‘या’ गोष्टीत विराटला देखील मागं टाकलं
- लग्नाच्या काही दिवसातच केएल राहुलचा अथियाबद्दल मोठा खुलासा
- बर्फाच्या पाण्याने अंघोळ केल्यास होतात ‘हे’ जबरदस्त फायदे
- बापरे! पूर्वी 7 मुलं आणि आता एकाचवेळी पाच मुलांना दिला जन्म