नवी दिल्ली | संपूर्ण जग हे कोरोनामुळे हैराण आहे. अनेक बलाढ्य देशांनी करोना महामारी पुढे अक्षरशः हात टेकले आहेत. कोरोनावरील उपचारात हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध महत्त्वाची भूमिका बजावतं. भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची निर्यात सुरू केली. याच पार्श्वभूमीवर इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पाठवल्याबद्दल माझे प्रिय मित्र नरेंद्र मोदींचे धन्यवाद, असं नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. नेतान्याहू यांनी ट्विटमध्ये मोदींचा उल्लेख ‘प्रिय मित्र’ असा केला आहे. मोदींनीही त्याच्या या ट्विटला उत्तर दिलं आहे. भारतात हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाच्या निर्यातीला बंदी होती. मात्र अनेक देशांनी याची मागणी केल्यावर मोदींनी औषध इतर देशांना पुरवलं. त्यामुळे मोदींचे संबंधित देशाचे पंतप्रधान कौतूक आणि आभार मानत आहेत.
आपण सोबत राहून या महामारीचा सामना करूयात,भारत देश शक्य तेवढी मदत आपल्यामित्रांना करेल, असं मोदींनी बेंजामिन नेतान्याहूच्या ट्विटला प्रतिसाद दिला आहे. इस्राईलच्या नागरिकांना उत्तम आरोग्यासाठीही शुभेच्छा मोदींनी दिल्यात.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांनीदेखील मोदींचे आभार मानले आहेत. बोल्सोनारो यांनी तर मोदींची तुलना थेट लक्ष्मणासाठी संजीवनी आणणाऱ्या हनुमानाशी केली होती.
Thank you, my dear friend @narendramodi, Prime Minister of India, for sending Chloroquine to Israel.
All the citizens of Israel thank you! 🇮🇱🇮🇳 pic.twitter.com/HdASKYzcK4
— PM of Israel (@IsraeliPM) April 9, 2020
We have to jointly fight this pandemic.
India is ready to do whatever is possible to help our friends.
Praying for the well-being and good health of the people of Israel. @netanyahu https://t.co/jChdGbMnfH
— Narendra Modi (@narendramodi) April 10, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
महाराष्ट्रात नक्की चाललंय काय?, गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा- चित्रा वाघ
वाधवान कुटुंबाला फिरण्यासाठी विशेष पत्र देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यावर गृहमंत्र्यांनी केली कारवाई!
महत्वाच्या बातम्या-
गायिका कनिका कपूरची सहावी टेस्ट निगेटीव्ह; डिस्चार्जनंतर होम क्वारंटाईन
राजभवनात जाऊन काड्या करणं महाराष्ट्राच्या हिताचं नाही- संजय राऊत
आयपीएलमधील या संघाने कोरोना बाधितांसाठी दिले तब्बल 10 कोटी
Comments are closed.