बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर तो माझा शेवटचा क्षण असेल”, पंकजा मुंडेंचं भावनिक प्रत्युत्तर

बीड | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बीड जिल्ह्यातील आमदारांनी बीडचा बिहार झाल्याची तक्रार केली होती. त्यावरून आता बीड जिल्ह्यातील राजकारण रंगलेलं पहायला मिळत आहे. राज्याचे सामाजिक मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर बीड जिल्ह्याची बदनामी केली, असा आरोप केला होता. त्यावरून पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

माझ्या काळात एकही माणूस माझ्यापासून दुरावलेला नाही. माझं ऑपरेशन झालेलं आहे. बोलायला लागले तर घसा दुखत आहे, तरीदेखील मी बोलत आहे. चांगली कामे केली पाहिजेत, करून घेतली पाहिजे. मी, बीडसाठी खुप काही केलं आहे. मात्र, बीडच्या बदनामीचे खापर माझ्यावर फो़डलं जातंय, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

बीडच्या बदनामीचे काम मी कधीचं केलं नाही. तसे केले तर तो माझ्यासाठी शेवटचा क्षण असेल, असं पंकजा म्हणाल्या आहेत. बीड जिल्ह्याची बदनामी कोणी केली हे सर्व महाराष्ट्रला माहिती आहे. मी बीड जिल्ह्याची काळजी केली आहे. ते विरोधी पक्षात असताना किती त्रास द्यायचे, वैयक्तिक आरोप लावायचे, किती चौकशा लावायचे हे सर्वांनाचं माहिती आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पाच वर्ष आम्ही सत्तेत होतो. प्रत्येक कोनशिला आणि निमंत्रण पत्रिकेवर त्यांचं नाव असायचं. मात्र, त्यांनी मोठेपणा दाखवला नाही. आम्ही नक्की दाखवू, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. राजकारण बाजूला ठेवून बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही नेहमी प्रयत्न केला आहे. बीड जिल्ह्याचा विकास केला हे सत्य जगासमोर आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या- 

शिवसेना आणि भाजप भविष्यात एकत्र येणार?; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं…

“राष्ट्रवादीने टाकलेली ती एक गुगली होती, आता शिवसेनेचं हिंदुत्व फिकं पडतंय”

“देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य मोदींना देखील मान्य नसेल, 1993च्या दंगलीत…”

महागाईचा पुन्हा भडका उडाला! मार्च महिन्यात दूध, मॅगीसह ‘या’ गोष्टी महागल्या

“… आणि तोपर्यंत देवेंद्र फडणवीसांचा थयथयाट असाच सुरू राहिल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More