बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…..म्हणून केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या ट्विटर हँडलची ‘ब्लू टिक’ हटवली

नवी दिल्ली | ट्विटरनं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान व कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या ट्विटर हँडलची ‘ब्लू टिक’ हटवली होती. त्यामुळे पुन्हा एकदा ट्विटर विरुद्ध केंद्र सरकार हा वाद उभा राहिला आहे.

राजीव चंद्रशेखर यांचं ट्विटर हँडल Rajeev MP या नावाने होतं. त्यानंतर आता मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर Rajeev GOI असं करण्यात आलं आहे. त्यामुळे हे ब्लू टिक गेल्याचं बोललं जात आहे. चूक लक्षात आल्यावर राजीव चंद्रशेखर यांच्या ट्विटर हँडलची ‘ब्लू टिक’ हटवल्यानंतर काही वेळानं ट्विटरकडून चंद्रशेखर यांच्या हँडलची ‘ब्लू टिक’ पूर्ववत करण्यात आली.

राजीव चंद्रशेखर यांच्याकडेही नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक आणि सूचना तंत्रज्ञान राज्यमंत्रिपदाची त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र त्यांनी पदभार स्वीकारताच त्यांच्या ट्विटर खात्यावरील ब्लू टिक हटवण्यात आल्याचं समोर आलं.

दरम्यान, जर अकाउंट खूप दिवसांपासून अॅक्टिव नसेल तर ब्लू टिक हटवली जाते. यासाठी कंपनी कोणतीही नोटिस देत नाही. ट्विटर पॉलिसीमध्ये स्पष्ट म्हटले की कोणत्याही नोटिसीविना ब्लूट टिक व्हेरिफिकेशनला हटवू शकते. अद्याप राजीव चंद्रशेखर यांच्या ट्विटर हँडलची ‘ब्लू टिक’ हटवल्याचं कारण समोर आलेलं नाही.

 

थोडक्यात बातम्या – 

“रोहित पवार एकदा मतदारसंघात येतात आणि 10-15 फोटो काढून जातात”

“नाना पटोले यांच्या वक्तव्यांवरून महाविकास आघाडीमध्ये किती अविश्वासाचं वातावरण आहे, हे दिसून येते”

“केंद्रातील सहकार खात्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळीवर गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही”

“कोरोनाकाळात उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री झाला नसता हे त्यांनी आपल्या कार्याने दाखवून दिलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More