बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून पोलीस स्टेशनमध्येच नवरीला लागली हळद, कारण ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल

जयपूर | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वात मोठी भूमिका पार पडत असलेल्यांमध्ये पोलिसांचा देखील समावेश होतो. अशातच एका महिला पोलीस काॅन्स्टेबलच्या हळदी समारंभानंतर संपुर्ण परिसरात एकच चर्चा रंगली आहे. संबंधित महिलेची हळदी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महिलेने तिच्या अशा स्थितीमध्ये देखील सुट्टी न घेतल्याने सगळ्यांनाच तिचा अभिमान वाटत आहे.

राजस्थानमधील डुंगरपूर येथील पोलिस ठाण्यातील ही घटना आहे. महिला पोलिस काॅन्स्टेबलचं नाव आशा असं आहे. आशा या लवकरच लग्न गाठ बांधणार आहेत. आशा यांचं लग्न 30 एप्रिलला असून त्यांच्या लग्नाचे अनेक पुर्व कार्यक्रम चालू आहेत. अशात काल आशा यांचा हळदी समारंभ होता. मात्र कोरोनाच्या ड्यूटीमुळे त्यांना सुट्टी मिळाली नाही. या कारणामुळे संबंधित पोलीस ठाण्यातील सगळ्यांनी मिळून आशाला अत्यंत छान सप्राईज दिलं आणि आशाचा हळदीचा कार्यक्रम पोलीस ठाण्यात आयोजित केला.

हळदी समारंभामध्ये नवरीला बेडवरुन फेकण्यात येतं. असा रिवाज त्यांच्याकडे आहे. पोलीस ठाण्यात बेड नसल्यामुळे तिथल्या लोकांनी आशा यांना खुर्चीवरुन फेकलं. सगळ्या रिती व्यवस्थितपणे पार पाडून आशा यांचा हळदीचा कार्यक्रम पोलीस ठाण्यात पार पाडण्यात आला, असं इनचार्ज दिलीप दान चरण यांनी सांगितलं. या कार्यक्रमानंतर संध्याकाळी आशा यांना सुट्टी मिळाली आणि त्या घरी गेल्या.

दरम्यान, हळदी समारंभानंतर आता आशा यांचं 30 एप्रिलला लग्न आहे. यादरम्यान त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच लग्न मागील वर्षीच होणार होतं. मात्र कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे ते पुढं ढकलण्यात आलं.

थोडक्यात बातम्या-

दादा-भाईंना दणका, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘या’ दोन मोस्ट वॅान्टेडला ठोकल्या बेड्या!

सोनम गुप्तानंतर आता पुष्पाचा संदेश चर्चेत; म्हणते दिपुजी मला पळवून न्या!

मोठी बातमी! राज्यातील भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याचं कोरोनाने निधन

विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो- चंद्रकांत पाटील

ती लिव्ह इन रिलेशनमधून बाहेर पडली, फोनही उचलेना, त्यानं केलं अत्यंत किळसवाणं कृत्य!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More