बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य केलं’; नाना पटोलेंची भाजपवर जहरी टीका

मुंबई | मराठवाडा मुक्तीसंग्रामचा लढा भारताच्या इतिहासात अजरामर झाला. त्यामुळे आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. आज औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ध्वजारोहनचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजकीय टोलेबाजी केली. तर मुख्यमंत्र्यांनी भाजप सेना युतीबाबत काही सूचक संकेत देखील दिले आहेत. त्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्र्यांना असे जोक करण्याची सवय आहे. भाजप सध्या तणावात आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. भाजपच्या समाधानासाठी मुख्यमंत्री बोलले असतील. ते कोणत्या अर्थाने बोलले हे फक्त मुख्यमंत्रीच सांगू शकतील, असं नाना पटोले म्हणाले होते. आम्ही सत्तेत बसताना आनंदाने आलोय पण आम्ही असं कधी बोललो नाही, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

केवळ भाजपला सत्तेतून दूर ठेवायचा होतं म्हणून आम्ही सत्तेत आलो असल्याचं देखील नाना पटोले यांनी सांगितलं. आम्ही 2024 ची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आम्ही काम देखील सुरू केलंय. तर दुसरीकडे भाजप दिवसाढवळ्या सत्तेचं स्वप्न बघत आहे, अशी टीका देखील नाना पटोले यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता शिवसेना आणि भाजपकडून राजकीय प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. संजय राऊत, अब्दुल सत्तार, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानं आता सेना भाजप युती होणार का?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

थोडक्यात बातम्या-

ऐनवेळी आली ‘ती’ गुप्त खबर अन् पाकिस्तानात असलेल्या न्यूझीलंडने घेतला परतण्याचा निर्णय

सावधान! कोरोनामधून बरे झालेल्या लोकांमध्ये ‘या’ आजाराचा धोका वाढतोय

…म्हणून ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी मागितली जाहीर माफी, पाहा व्हिडीओ!

…तरच पैसे मिळतील, जे काय करेल ते सरळ करेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार असतील तर आमची युतीसाठी तयारी’; शिवसेनेकडून स्पष्ट संकेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More