बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून पोलीस आयुक्तांनी मानले पुणेकरांचे आभार!

पुणे | यंदाही कोरोनाचा धोका लक्षात घेता गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्यात आला. कोरोना नियमांचं पालन करतच गणेशाला निरोप देण्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं होतं. अशातच पुण्यामध्येही गणपती बाप्पांना निरोप अगदी साधेपणानं देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पुणेकरांचं कौतुक करण्यात आलं.

गणपती विसर्जनाला गर्दी करु नका, जास्त दंगा घालू नका असे अनेक नियम व अटी पुण्यातील गणेश मंडळांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुण्यातील यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पडला. नियमांचं पालन करत सगळ्यांनी गणोशोत्सव पार पाडला. सगळंच शांततेत झाल्यामुळे पोलिसांनाही कसलाच ताण झाला नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणेकरांचं मनापासून आभार मानले आहेत.

यंदाही कोरोनाच्या सावटाखाली गणेशाचं आगमन आणि विसर्जन करण्यात आल्यानं अनेक गणेशभक्त नाराज झाले आहेत. मात्र कोरोनाचा धोका लक्षात घेत पर्यावरणाची काळजी घेत गणेशोत्सव पार पाडला. त्यामुळे आता बाप्पांची विसर्जन मिरवणूक नसल्यामुळं सारं कसं साधेपणानं, शिस्तबद्धपणे आणि पर्यावरणाची काळजी घेऊनच झालं, असं म्हणत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणेकरांचे मनापासून आभार मानले आहेत.

दरम्यान, पुढल्या वर्षी गणेशोत्सव प्रचंड उत्साहाने, पण अशाच शिस्तीनं, इकोफ्रेन्डली पद्धतीनं साजरा होऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या, असं अमिताभ गुप्ता यांनी म्हटलं.

थोडक्य़ात बातम्या – 

किरीट सोमय्यांना कोल्हापूरच्या वेशीवरच अडवलं जाणार?, जिल्हा प्रशासनाने दिले जमावबंदीचे आदेश

धक्कादायक! 73 वर्षीय आजोबांना पाच वेळा कोरोना लस; सर्टीफिकेटमध्ये झाला ‘हा’ घोळ

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार चरणजीत सिंह चन्नी, 11 वाजता घेणार शपथ

“महाविकास आघाडी सरकारचं विसर्जन व्हावं ही जनतेची इच्छा”

‘बिग बॉस’च्या घरात कलाकारांबरोबर किर्तनकारही पाहायला मिळणार, वाचा सर्व स्पर्धकांची यादी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More