बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून देशात जाणवतोय कोळशाचा तुटवडा, केंद्रानं दिलं उत्तर

नवी दिल्ली | देशात अनेक ठिकाणी कोळशाची कमतरता जाणवत आहे. ही कमतरता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यातच देशातील विजनिर्मीतीसाठी कोळशाच्या पुरेशा साठ्याची गरज असते मात्र आता कोळशाच्या टंचाईमुळे वीज टंचाईही जाणवत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली.

कोळशाची टंचाई जाणवत असल्यामुळे अनेक राज्य ब्लॅक आउटची शंका व्यक्त करत आहे. सप्टेंबर महिन्यात कोळसा खाणी भागात मुसळधार पावसामुळे कोळसा उत्पादनावर परिणाम झाला. बाहेरून येणाऱ्या कोळशाच्या किमती लक्षणीय वाढल्या आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला कोळशाचा पुरेसा साठा नव्हता. या कारणांमुळे कोळशाची कमतरता जाणवत आहे.

अर्थव्यवस्था पुन्हा वेगानं धावू लागल्यानं विजेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. यातच कोळशाच्या खाणींमध्ये मुसळधार पावसामुळे कोळसा उत्पादन आणि वाहतुकीवर परिणाम होत आहे.

दरम्यान, पुढील काही दिवसांत पुढील काही दिवसांत कोळशाचं संकट कमी होण्याची शक्यता आहे. सरकार पुढील पाच दिवसात कोळशाचं उत्पादन 1.94 मिलियन टनावरुन वाढवून 2 मिलियन प्रतिदिन करणार आहे. यासोबतच राज्यांकडे अद्याप कोल इंडियाचे सुमारे 20000 कोटींचे देणे बाकी आहे, असं केंद्रानं सांगतिलं.

थोडक्यात बातम्या –  

महाविकास आघाडीतील धुसफुस पुन्हा चव्हाट्यावर, वडेट्टीवार ‘या’ कारणामुळे नाराज

“दसऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला सुरूवात; आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार”

…अन् भाजप उमेदवाराला पडलं फक्त ‘1 मत’; खुद्द परिवाराने फिरवली पाठ

”जवा गातीस तू एक गाणं, मला अजून मुख्यमंत्रीच असल्यासारखं वाटतंय”

आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जय्यत तयारी! शरद पवारांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More