बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून ‘अनलॉक’च्या निर्णयावर गोंधळ झाला’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

मुंबई | सध्या राज्यात कोरोनाची आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपुर्वी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पाच टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय घेतला होता मात्र काही वेळातच राज्यातील कोणत्याही भागातील निर्बंध हटवण्यात आले नाही. तसेच नव्या नियमांचा प्रस्ताव हा विचाराधीन असल्याचं  मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं होतं. या गोंधळावर मुख्यमंत्र्यानी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

अजूनही निर्बंध उठवल्याचं जाहीर केलेलं नाही. स्थानिक प्रशासन हा निर्णय घेणार आहे. प्रशासनाला मदत होण्यासाठी हे निकष ठरवण्यात आले आहेत. कारण प्रशासनाला परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेता यावा, म्हणून हे केलं पण निर्बंध उठवण्यात आलेले नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसत्ताच्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक होती त्या बैठकीमध्ये दहावी-बारावी परीक्षेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यात हे निकष सूचवण्यात आले. मात्र त्यावेळी विजय वडेट्टीवारांचा गैरसमज झाला आणि त्यांना वाटलं ठरलंय, त्यामुळे त्यांनी जाहीर केलं. पण प्रशासनाला आढावा घेण्याची सूचना करण्यात आली होती, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या स्पष्टीकरणानंतर विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. हे सरकार नसून सर्कस आहे , अशा शब्दात भाजप आमदार अतुल भातखळकरांनी टीका केली होती.

थोडक्यात बातम्या- 

कोरोना झालेल्या महिलेच्या हृदयातून काढली चक्क 7 सेंटीमीटरची गाठ

सकारात्मक बातमी! शनिवारी देशात गेल्या काही दिवसांतील सर्वात कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद

‘या’ अभिनेत्रीचा क्रिकेट खेळतानाचा मजेशीर अंदाज होतोय व्हायरल; पाहा व्हिडीओ 

हळद ते मिरवणुकीपर्यंत तरुणाच्या डान्सने घातला धुमाकूळ, पाहा व्हिडीओ

“मराठा समाजाला आरक्षण देऊन अशोक चव्हाण यांचा राजीनामा 5 जुलैपर्यंत घ्या, नाहीतर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More