बंगळुरु | कर्नाटकातील कोडगु जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने घराला आग लावल्या कारणाने त्याच्या पत्नी आणि मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तसेच या आगीत अणखीण 4 जणं देखील जळाले आहेत.
ही घटना कर्नाटकातील विराजपेत तालुक्यातील मुगुतागेरी गावातील आहे. आरोपीचं नाव येरवरा भोजा असून तो मुगुतागेरी गावातील रहिवासी आहे. तसेच त्याचं वय 52 वर्ष आहे. भोजा यांना दारुचं व्यसन असल्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीमध्ये सतत बाद होत असे. या कारणामुळे एकदा त्यांची पत्नी कंटाळून तिच्या भावाची घरी राहण्यास गेली. यादरम्यान ती आपल्या मुलांना देखील घेऊन गेली. या गोष्टीचा भोजी यांना प्रचंड राग आला.
दारुच्या नशेत राग आनावर न झाल्यामुळे भोजा यांनी थेट पत्नीच्या भावाचे घर गाटले. सगळे झोपले असताना घराला बाहेरुन टाळा लावला. भोजा यांनी घराची कौले कोढून घरात पेट्रोल ओतले आणि आग लावली. यामध्ये त्यांची पत्नी आणि मुलांचा जळून मृत्यू झाला. या प्रकराची माहिती मिळताच आरोपीच्या पत्नीच्या भावाने घटनास्थळी धाव घेतली आणि घरातील उर्वरित 4 जणांना बाहेर काढले.
दरम्यान, उर्वरित चार जणांचा रुग्णालयात उपचार चालू आहे. तसेच या घटनेमध्ये आरोपीच्या पत्नी आणि मुलांचा मृत्यू झाला असून आरोपी त्याच्या पत्नीला दारु पिऊन मारहाण करत असल्याचं देखील समोर आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
50 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावरुन भारतात परतणार 82 वर्षांच्या चौकीदाराची प्रेयसी
“एक कोरोनाचा रुग्ण सापडला तर आजूबाजूची 20 घरं करणार सील”
AIIMS प्रमुखांचा देश पातळीवरील लाॅकडाऊनबाबत सरकारला महत्वाचा सल्ला
‘या’ कारणाने नवऱ्यानेच तिचा अश्लिल व्हिडीओ काढुन केला सोशल मिडियावर व्हायरल
मुख्यमंत्र्यांच्या नियमांना शिवसैनिकाकडुनच केराची टोपली; झाली ‘ही’ कारवाई
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.