बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून जिवंत माणसाला तिरडीवर झोपवून वाजत गाजत गावातून अंत्ययात्रा काढली!

भोपाळ | एकिकडे देशातील बहुतांश राज्यांमध्ये मान्सूनचं जोरात आगमन झालं आहे. तर दुसरीकडे अद्याप काही राज्यांमध्ये वरुनराजाने आपलं दर्शन दिलेलं नाही. मध्य प्रदेशमधील कित्येक जिल्ह्यांमध्ये देखील अद्याप पाऊस झालेला नाही. यामुळे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे. यंदा चांगला पाऊस व्हावा म्हणून मध्य प्रदेशच्या काही गावातील लोक वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. धार जिल्ह्यातील लोकांनी देखील पाऊस येण्यासाठी अजब उपाय शोधला आहे.

धार जिल्ह्यातील सारदापूर या गावात जून महिना संपला तरी देखील पाऊस झालेला नाही. पाऊस नसल्याने गावातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू लागला आहे. तसेच शेत जमिनी देखील कोरड्या पडल्या आहेत. यामुळे वरून राजाला प्रसन्न करण्यासाठी गावातील लोकांनी जिवंत माणसाची अंत्ययात्रा काढली आहे.

माहितीनुसार, गावकऱ्यांनी मुकेश भाबर नावाच्या एका व्यक्तीला तिरडीवर झोपवले. यानंतर मृत व्यक्तीच्या विधीप्रमाणे सर्व विधी करून गावातून त्याची अंत्ययात्रा काढली. या अंत्ययात्रेच्या वेळी ढोल ताशे देखील वाजवण्यात आले. गावातील लोकांनी मोठ्या संख्येने या अंत्ययात्रेत सहभाग घेतला.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्यावर्षी देखील गावात पाऊस झाला नव्हता. यामुळे हाच उपाय गेल्यावर्षी देखील करण्यात आला होता. यानंतर गावात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. सध्या सोशल मीडियावर या गावाची चर्चा चांगलीच रंगली आहे.

थोडक्यात बातम्या – 

“उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी आता परिणाम भोगायला तयार राहावं”

‘तुझे काही व्हिडीओ माझ्याकडे आहेत, उत्तर दे नाहीतर…’, ट्विटरवर सनी लिओनीला मिळतेय धमकी

महाराष्ट्रातील प्रवाश्यांना कर्नाटकमध्ये जायचं असल्यास ‘या’ नियमाचं करावं लागणार पालन

“शरद पवारांनी कोणाकोणाची जात काढली हे राज्याला माहितीये, भाजपने मला शहाणपणा शिकवू नये”

खुशखबर! आता इंजिनीअरिंग मराठीतही करता येणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More