बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून पुढील दोन-तीन दिवसात टाळेबंदीचा निर्णय घेतला जाईल – किशोरी पेडणेकर

मुंबई | सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. परंतू वैज्ञानिकांकडून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने निर्बंध पुन्हा कडक केले आहेत. याच पार्श्वभूमिवर व्यापाऱ्यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं. त्यामध्ये नियमित दुकाने खुली ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक वक्तव्य केलं.

आंदोलन करणाऱ्या या व्यापाऱ्यांना काही राजकारणी भडकावत असल्याचा आरोप करत, किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. मात्र त्याचे समूळ उच्चटन झालेले नाही. त्याचप्रमाणे काही भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अजुनही दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता पुढील दोन-तीन दिवसांमध्ये टाळेबंदीचा निर्णय होणार असल्याचं पेडणेकरांनी सांगितलं आहे. तसेच गुरूवारी येत्या गुरूवारी म्हणजेच 15 जूलै रोजी टाळेबंदी संबंधित बैठकही होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्या बैठकीमध्ये सध्याच्या नियमांमध्ये काही सूट मिळण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचंही त्या म्हटल्या आहेत.

दरम्यान, राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या हळू-हळू कमी होत असल्याचं दिसून येत आहे. नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सोमवारी राज्यात 7 हजार 603 रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यात आतापर्यंत 59 लाख 27 हजार 756 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी 15 हजार 277 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट 96.15 टक्क्यांवर गेला आहे.

थोडक्यात बातम्या-

पंकजा मुंडेंची नाराज समर्थकांसोबत महत्त्वाची बैठक; मुंडे भगिनींच्या भूमिकेकडे लक्ष

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 118 दिवसातील निच्चांकी नोंद

भारतात कोरोनाची तिसरी लाट ‘या’ तारखेपासूनच सुरू झाली, वैज्ञानिकांनी केला धक्कादायक दावा!

‘कोरोना लसीचे डोस मिक्स घेऊ नका’ ; WHO चा गंभीर इशारा

माजी राज्यमंत्र्यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’; नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More