बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर मोठी किंमत मोजावी लागेल”; मेहबूबा मुफ्तींचा मोदींना थेट इशारा

नवी दिल्ली | जम्मू आणि काश्मीरमध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांच्या काही दिवसांपूर्वी हत्या झाल्या होत्या. या हत्येनंतर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या सर्वेसर्वा मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मिरींच्या सामूहिक अटकेच्या विरोधात मोदी सरकारला इशारा दिला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षादलांनी 500 पेक्षा अधिक नागरिकांना ताब्यात घेतलं आहे, या वृत्तावर मुफ्ती यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

आपणा सर्वांना माहिती आहे, की काश्मिरी पंडित आणि श्रीनगरमधील एका शीख महिलेच्या मृत्यूनंतर स्थानिक प्रशासन काश्मिरी नागरिकांच्या विरोधात अत्याचार सुरू करेल. मोदी सरकार आपलं अपयश लपवण्यासाठीच ही कारवाई करत असल्याचा आरोप मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

स्थानिक प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू आहे. काश्मिरी नागरिकांना ताब्यात घेतलं जात आहे. प्रशासनाकडं कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असा दावा मुफ्ती यांनी केला आहे. जर लोकांना याच पद्धतीने ताब्यात घेण्याचं सुरू राहिलं तर त्याचे धोकादायक परिणाम होतील. मोदी सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी केलेल्या कारवायांमुळं काश्मीर खोऱ्यात अशांतता वाढल्याचं दिसून येत आहे. जम्मू काश्मीरमध्ये धार्मिक तेढ निर्माण व्हावा या हेतूने दहशतवादी जाणीवपूर्वक गैर मुस्लिमांना लक्ष्य करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यातच आता मुफ्ती यांनी सुरक्षादलांवरच गंभीर आरोप केल्याचं पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

“काँग्रेस लोकसभा निवडणूक जिंकणारच”, पी. चिदंबरम यांनी सांगितलं ‘हे’ मोठं कारण

3 सेकंदात हत्या, 24 तासात गुन्हेगार जेरबंद; थरकाप उडवणारी घटना

बाॅलिवूडमध्ये घराणेशाहीपेक्षा ‘वर्णभेद’ ही मोठी समस्या – नवाजुद्दीन सिद्दीकी

झुनझुनवालांसाठी ‘हा’ शेअर ठरला मल्टिबॅगर, 3 दिवसात कमावले 310 कोटी

“तुम्ही ज्या मुख्यमंत्र्याची जात काढली, त्याच मुख्यमंत्र्याने मराठा आरक्षण दिलं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More