बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून दारु दर कमी केले’; अजित पवारांनी सांगितलं कारण

मुंबई | कोरोना काळात महागाईनं तर उच्चांकच गाठलेला पहायला मिळालं. त्यामुळे सगळ्याचं गोष्टी महाग झाल्या. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने इंधनावरील दर कमी केले, यामुळे पेट्रोल 10 आणि डिझेल हे 5 रुपयांनी स्वस्त झाले. अशातच हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दारुचे दर कमी करण्यावरुन सरकारला सुनावलं आहे.

‘वाह रे MVA तेरा खेल, सस्ती दारु, महंगा तेल’, असं वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी महविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. आता यावरच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दारुचे दर कमी का केले? यावर उत्तर दिलं आहे.

पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी दारु दर कमी करण्याविषयी वक्तव्य केलं. मधल्या काळात विदेशी मद्यावर काही प्रमाणात कपात करण्यात आली. त्यावरुन सस्ती दारु, महंगा तेल, असं काहीतरी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

पहिल्यांदाच तो टॅक्स इतक्या मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. मी सर्व राज्यांची माहिती घेतली. एवढा मोठा टॅक्स इतर राज्यात कुठेही नाही. त्यामुळे तो टॅक्स इतर राज्यांच्या बरोबरीला आणण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही तो टॅक्स जास्तच आहे. त्यावर अजिबात दुसरी कोणतीही भूमिका नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

थोडक्यात बातम्या – 

‘महाराष्ट्राला रामभरोसे ठेवता येणार नाही’; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

Omicronचा वेग डेल्टाच्या तिप्पट; ‘या’ राज्यातील फैलावामुळे चिंता वाढली

चिंताजनक! Omicronच्या धास्तीनं अनेक राज्यांत ‘या’ गोष्टीवर घातली बंदी

काँग्रेस मंत्र्याचा मंत्रीमंडळातून पत्ता कट?, नाना पटोेले म्हणतात…

पुन्हा लाॅकडाऊन लागणार का?, केंद्र सरकारचं राज्यांना तातडीचं पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More