बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून भारतात कोरोनाची दुसरी लाट इतक्या वेगाने पसरली’; WHO ने सांगितलं कारण

नवी दिल्ली | कोरोनाची पहिली लाट गेल्यानंतर दुसऱ्या लाटेसाठी भारत तयार नव्हता. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात थैमान घातलं. त्यामध्ये ऑक्सिजन तुटवडा भासला त्यामुळे अनेकजणांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र भारतात कोरोनाची दुसरी लाट इतक्या वेगाने कशीकाय पसरली?, यावर जागतिक आरोग्य संघटनेने यामागचं कारण दिलं आहे.

भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये आढळलेल्या B.1.617.2 व्हेरियंटला डेल्टा  व्हेरियंट म्हटलं गेलं आहे. दुसऱ्या B.1.617.1 स्ट्रेनला कप्पा असं नाव देण्यात आलं आहे. त्यासोबतच इतर देशांमध्ये आढळलेल्या व्हेरियंटलाही नाव देण्यात आली आहेत. यातील डेल्टा या स्ट्रेनच्या एक विषाणूचं स्वरूप दुसऱ्या स्ट्रेनपेक्षा घातक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

भारतात विषाणूची दुसरी लाटे जास्त वेगाने पसरण्यामागे डेल्टा वेरियंटची महत्त्वाची भूमिका होती. डेल्टा वेरियंट अल्फापेक्षा 50 टक्के ज्यास्त संसर्गजन्य आहे. त्यामुळे विषाणू संक्रमण वेगाने होतं. हे विषाणू स्वरुप तीन म्यूटेंट वेरिएंट आहे. कारण या स्वरुपातून विषाणू तीन लिनिएजमध्ये पसरला जात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासानुसार सांगितलं आहे.

दरम्यान, या वेरियंटला नाव देण्यावरून वाद निर्माण झाला होता. मे महिन्यात सुरूवातीला सापडलेल्या या स्ट्रेनला भारतीय म्हणण्यावरून मोठा वाद झाला होता. त्यावेळी केंद्र सरकारने जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या B.1.617 व्हेरियंटला भारतीय व्हेरियंट नाव दिल्याच्या बातम्यांवर आक्षेप घातला होता.

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! पाच मुलांच्या आईने प्रियकराला सोबत घेऊन केली स्वत:च्याच पतीची हत्या

….म्हणून तरूणाने पोलिसांना फोन करत दिली थेट पंतप्रधान मोदींना मारण्याची धमकी

बाबो! पिंपळाला लागलाय आंबा?, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर समोर आलं खरं कारण

काँग्रेसने अण्णासाहेब पाटलांची हत्याच केली- विनायक मेटे

लाखो रुपये नव्हे फक्त 10 रुपयात ‘हे’ डॅाक्टर दाम्पत्य करतंय कोरोनावर उपचार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More