बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर पुढच्या दोन आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात येईल”

नवी दिल्ली | कोरोनाच्या संसर्गाचं थैमान जगभरात सुरु असताना कोरोनाचे नवीन स्ट्रेन आढळत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. अशात एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. कोरोनाची ही लाट कधीपर्यंत राहील या प्रश्नाचं उत्तर सफदरजंग रुग्णालयातील कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्राध्यापक आणि मुख्य डॉक्टर जुगल किशोर यांनी दिलं आहे.

सगळं काही व्यवस्थित घडलं तर कोरोनाची दुसरी लाट कमाल दहा दिवसांपासून ते दोन आडवड्यांदरम्यान संपुष्टात येईल, अशी शक्यता डॉ. जुगल किशोर यांनी वर्तवली आहे. तसेच लसीकरणाचा वेग वाढवला आणि अधिकाधिक लोकांचं लसीकरण केलं तर आपण या लाटेला वेळेवर थोपवण्यात यशस्वी ठरू, असं जुगल किशोर म्हणाले.

आपण सर्वांनी कोविडबाबतच्या नियमांचं कठोरपणे पालन करावं आणि या विषाणूला रोखण्यासाठी आपली भूमिका पार पाडावी. मात्र जर रस्त्यांवर लोकांची गर्दी कायम राहिली. बाजारात वर्दळ राहिली तर कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचा कालावधी तेवढाच अधिक प्रमाणात वाढेल. याशिवाय लसीकरणाचा वेग वाढवला आणि अधिकाधिक लोकांचे लसीकरण केलं तर आपण या लाटेला वेळेवर थोपवण्यात यशस्वी ठरू, असं डॉ. जुगल किशोर यांनी म्हटलं आहे.

सक्रिय रुग्णांच्या संख्येत जसजशी घट होईल. तसतसा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोपही कमी होईल. लस मिळाल्याने या विषाणूला पसरण्यापासून रोखता येऊ शकेल, असं जुगल किशोर यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“चक्रीवादळ गुजरातला पळवण्याचा मोदी-शहांचा डाव, राऊत मुंबईतच अडवणार”

चक्रीवादळातही प्रामाणिकपणे आपलं काम करत राहिली महिला, पाहा व्हिडीओ

“सतत केंद्राकडं बोट दाखवण्याची सवय सोडा, राज्य सरकारने असं वागणं बर नाही”

मरीन ड्राईव्हवर समुद्राचं रौद्र रुप; अंगावर काटा अणणारा व्हिडीओ समोर

मिरगीचा झटका येऊन बेशुद्ध पडलेल्या नवरदेवाला शुद्ध येताच धू-धू धुतलं; कारण वाचून व्हाल अवाक्

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More