बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमनं मागितली नारायण राणेंची माफी

मुंबई | छोट्या पडद्यावरचा अत्यंत लोकप्रिय मराठी शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ (chala hawa yeu dya). झी मराठीवरील हा शो प्रेक्षकांसाठी हास्याची मेजवाणी घेऊन येत असतो. पोट धरुन हसायला लावणारा हा शो आणि त्यामधील कलाकार नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात.

झी मराठीवरील (Zee Marathi) ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधे नुकतंच ‘दिवाळी अधिवेशन’ कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात राजकीय नेत्यांवर काॅमेडी करण्यात आली. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर करण्यात आलेल्या काॅमेडीवर राणे समर्थकांकडून आक्षेप घेतला. त्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली.

‘चला हवा येऊ द्या’ (chala hawa yeu dya) या कार्यक्रमात नारायण राणेंवर केल्या गेलेल्या काॅमेडीवर वाद निर्माण झाल्यावर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निलेश साबळे व त्याच्या टीमनं (Nilesh Sabale & Team) नारायण राणेंची भेट घेत त्यांची हात जोडून माफी मागितली.

दरम्यान, (Narayan Rane) नारायण राणेंची माफी मागताना निलेश साबळे आणि त्याच्या टीमनं म्हटलं की, आमच्या कार्यक्रमाचा उद्देश नेहमी प्रेक्षकांचं मनोरंजन करणे हाच राहिला आहे. यामुळे कोणाचीही भावना दुखवण्याचा आमचा कधीच उद्देश नव्हता. मात्र तरीही आमच्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे आम्ही दिलीगीरी व्यक्त करतो.

 

थोडक्यात बातम्या – 

महाविकास आघाडीत नाराजीचा सुर; शिवसेना मंत्र्याचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट, वाचा आकडेवारी एका क्लिकवर

“नरेंद्र मोदी सहजासहजी माघार घेणार नाहीत, त्यांनी माफी मागितली म्हणजे…”

अमाप रिटर्न्स देणाऱ्या क्रिप्टोकरन्सीचं काय होणार?, केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

वीजतोडणीचा प्रश्न पेटला, शेतकऱ्यांसाठी आमदाराचा गळफास घेण्याचा प्रयत्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More