बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून अमेरिका भारताला करणार तब्बल ‘एवढ्या’ कोटी डाॅलरची मदत

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचं संकट अजूनही टळलेलं नाही. कोरोना संकटावर मात करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. अशातच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अॅंटनी ब्लिंकन यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भारताच्या कोरोना लसीकरणासाठी मदत जाहीर केली.

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अॅंटनी ब्लिंंकन यांनी मोदींची भेट घेण्यापूर्वी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी ब्लिंकन यांनी भारताला कोरोना लसीकरणासाठी 2.5 कोटी डाॅलरची मदत देण्याची घोषणा केली.

पत्रकार परिषदेत बोलताना ब्लिंकन यांनी म्हटलं, कोरोनाचा भारत व अमेरिका या दोन्ही देशांना जबर फटका बसला. भारत व अमेरिका यांच्यातील संबंध हे महत्वाचे असून कोरोनाकाळात भारतानं केलेली मदत आम्ही विसरणार नाही.

दरम्यान, पुढे त्यांनी म्हटलं की, या काळात भारतानं आम्हाला मदत केली, या मदतीची परतफेड म्हणून अमेरिकेनं कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताला केलेल्या मदतीत आम्ही पूर्ण केली. भारत आणि अमेरिकेतून कोरोना महामारी संपविण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. आम्ही एकत्र काम करत राहू, असंही ब्लिंकन यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

मुंबई लोकल सामान्यांसाठी सुरू होणार?, राजेश टोपेंचं सुचक वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींची टि्वटरवर कमाल; फॉलोअर्सची संख्या 7 कोटींवर

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

मुंबईकरांनी करुन दाखवलं! आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More