मुंबई | खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे.
ईडीविरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु आहे. या मोर्चावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
शिवसेना ED ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे. हा मोर्चा मराठा आरक्षण साठी निघाला नाही. हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही. हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही. पण वैयक्तिक घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा! महाराष्ट्र धर्म?, असं ट्विट करत नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
दरम्यान, वर्षा राऊत यांची 5 जानेवारीला ईडीकडून चौकशी होणार आहे. तेव्हा शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेना ED ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे..
हा मोर्चा मराठा आरक्षण साठी निघाला नाही ..
हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही..
हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही..
पण वैयक्तिक घरातली उणी धुनी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा!
महाराष्ट्र धर्म?— nitesh rane (@NiteshNRane) January 3, 2021
थोडक्यात बातम्या-
‘कष्टाचं चीज झालं’; कोविशिल्डला मिळालेल्या परवानगीनंतर अदर पुनावाला यांनी व्यक्त केला आनंद
“राज्य सरकारने उठसूट कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणं बंद केलं पाहिजे”
काँग्रेसने नामकरणाला विरोध केल्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम नाही- संजय राऊत
पुण्यात धक्कादायक घटना!; काॅलसेंटरमधून घरी चाललेल्या तरुणीला रस्त्यात अडवून बलात्कार
शेतकऱ्यांशी बोलायला पंतप्रधानांना अपमान वाटतो- हसन मुश्रीफ