बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून महाराष्ट्रातील ‘या’ भाजप आमदाराची थेट पोलीस कोठडीत रवानगी!

जळगाव | शेतकऱ्यांचे शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडल्याप्रकरणी चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह जमावाने महावितरणचे अधीक्षक अभियंता माहेम्मद फारुख मोहम्मद युसूफ यांना खूर्चीत बांधून चपलांचा हार घालून मारहाण केली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेले आमदार चव्हाण यांच्यासह 31 जणांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता चव्हाण यांच्यासह सर्वांना 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आमदार चव्हाण यांच्यासह सुमारे 40 ते 50 जणांचा जमाव शुक्रवारी महावितरणच्या कार्यालयात गेला होता. त्यावेळी त्यांनी फारुख यांना दोरीने खुर्चीत बांधून मारहाण केली व चपलांचा हार घातला. याप्रकरणी फारुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शुक्रवारी रात्री आमदार चव्हाण यांच्यासह 40 ते 50 जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

31 जणांना रात्रीच अटक करण्यात आली. या सर्वांना आज न्यायाधीश डी. बी. साठे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तपासाधिकारी तथा पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे व सरकारी वकील गिरीष बारगजे यांनी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. संबधित संशयितांनी एका शासकीय अधिकाऱ्याला अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली, असं त्यांनी सांगितलं होत.

दरम्यान, कार्यालयात खुर्चीत बांधून मारहाण केली त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाला. या घटनेत वापरण्यात आलेला दाेर अद्याप मिळालेला नाही. जमावाने शासकीय कार्यालयास कुलूप लावलेले होते, त्याच्या चाव्या देखील भेटलेल्या नाहीत. या गुन्ह्याचा नेमका उद्देश काय याचा तपास करायचा आहे. यासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी हवी, असं पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे व सरकारी वकील गिरीष बारगजे यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

दोनदा कोरोना झाल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू पुन्हा आजारी, केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

सचिननंतर आता भारताच्या ‘या’ स्टार क्रिकेटपटूला देखील कोरोनाची लागण!

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

…म्हणून दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात माजी वनमंत्री संजय राठोड याचं नाव चर्चेत!

ठाकरे सरकारने सांगितलेला ‘हा’ नवा नियम पाळा, अन्यथा भरावा लागेल 1000 रुपये दंड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More