बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून तरुणाने स्वतःच्याच बापाच्या हत्येसाठी दिली 10 लाखांची सुपारी

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. प्रेम हे आंधळं असतं, मात्र याच प्रेमात बापाची हत्या करणं हे धक्कादायक आहे. अशीच एक घटना मेरठ येथे उघडकीस आली आहे. एका मुलाने आपल्याच बापाच्या हत्येसाठी तब्बल 10 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं उघड झालं आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच चर्चा रंगली आहे.

मेरठ येथील ध्यानचंद परिसरात कोळशाचे मोठे व्यापारी अरुण जैन राहतात. त्यांना एक सुपुत्र आहे. त्याचं नाव आयुष जैन असं आहे. आयुषचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत आणि त्याला तिच्याशीच लग्न देखील करायचं आहे. मात्र, अरुण यांना आयुषचं लग्न दुसऱ्या मुलीसोबत करायचं होतं. यामुळे बाप लेकामध्ये सतत वाद होत होता. या वादातून आयुष संतापला आणि त्याने आपल्याच बापाला संपवण्यासाठी 10 लाख रुपयांची सुपारी दिली.

ऑफिसमध्ये असताना 3 अज्ञात व्यक्ती आपला चेहरा झाकून अरुण यांच्या ऑफिसमध्ये घुसले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये अरुण यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच चौकशी दरम्यान अरुण यांच्या हत्येसाठी त्यांच्याच मुलाने 10 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं समोर आलं.

दरम्यान, पोलिसांनी मुख्य आरोपी आयुष सोबत आणखी तीन जणांना अटक केली आहे. तसेच याबाबत व्यवस्थित कारवाई करण्यात येईल, असं देखील यावेळी पोलीस म्हणाले. पोटच्या पोराला लहाणपणापासून अत्यंत प्रेम देऊन देखील काही काळापुर्वी आलेल्या प्रेमासाठी आपल्याच बापाची हत्या केलेलं पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

थोडक्यात बातम्या-

बाबो! …अन् चालू मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने केलं पत्नीला किस

“धोनीनंतर मराठमोळा ऋतुराज गायकवाड होऊ शकतो चेन्नईचा कर्णधार”

धक्कादायक! टिव्ही पाहायला गेलेल्या 5 वर्षीय मुलीवर तरुणाने केला बलात्कार

प्रसिद्ध अभिनेत्रीने केली भावाची हत्या, कारण अत्यंत धक्कायदायक

रेमेडेसिविर इंजेक्शनचे दुष्परिणाम उघड; ‘या’ जिल्ह्यात इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More