नांदेड | शुक्रवारी 15 जानेवारी रोजी राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचा आज निकार जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेडमधील एक गाव चांगलचं चर्चेत आलं आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात बिलोली तालुक्यातील मुतण्याळ या गावात मतदानाच्या दुसऱ्या दिवशी वादावादी झाली. त्यानंतर दोन गटात तुफान दगडफेक झाल्यानं, आता प्रत्यक्ष निकाल पाहायला या गावात कोणीच उरलं नाही.
निवडणुकीच्या वादातून झालेल्या हाणामारीनंतर मुतण्याळ गाव आता रिकामं झालं आहे. हाणामारी करणाऱ्या 38 जणांना पोलिसांनी अटक केली. तर अटकेच्या भीतीनं काही लोक गावातून पसार झाले आहेत.
दरम्यान, सध्या पोलिसांनी या गावात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. तसंच पोलिसांकडून या हाणामारीत सहभागी असलेल्या आरोपांचा कसून शोध घेतला जात आहे.
थोडक्यात बातम्या-
“शरद पवार यांच्या हृदयावरील ‘ही’ जखम भरून काढा”
‘2019 च्या सत्तास्थापनेची अजित पवारांशी नाही तर….’; फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट
“देशाच्या पंतप्रधानांना आव्हान देण्याची त्यांची ऐपत नाही”
पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस का घेतली नाही?- प्रकाश आंबेडकर
शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा