बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘स्वतःचे अपयश झाकण्यासाठी त्यांना अशा नकला कराव्या लागत आहे’; दानवेंची सरकारवर बोचरी टीका

मुंबई | काल राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वादळी अधिवेशन पहायला मिळालं. विरोधी पक्षानं अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी पक्षाला लक्ष केलं. त्यामुळे काल अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपाचा खेळ चांगलाच रंगलेला पहायला मिळाला. अशातच केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve) यांनीही सरकारवर ताशेरे ओढले.

भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची विधानसभेत नक्कल केली. त्यावरून देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे सभागृहाचं वातावरण चांगलंच पेटलेलं पहायला मिळालं. यावरुनच रावाहेब दानवेंनीही सरकारवर निशाणा साधला.

रावसाहेब दानवे यांनी सरकारला अनेक मुद्द्यांवरुन घेरलेलं पहायला मिळालं. राज्य सरकारने आपल्या कार्यकाळात विकासाची कामे केली नाही. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी त्यांना अशा नकला कराव्या लागत आहे, अशी बोचरी टीकाही केली.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने भाजप (bjp) आणि महाविकास आघाडीचे (MVA) नेते आता आमनेसामने आले आहेत. त्यामुळे या पाच दिवसांच्या अधिवेशनात काय होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.

थोडक्यात बातम्या – 

“आपल्याच आमदारांवर विश्वास नसलेलं हे सरकार आहे”

चहामध्ये फक्त ‘या’ दोन गोष्टींचा वापर करा आणि घरबसल्या झटपट वजन कमी करा

‘सत्तेतल्या दुर्योधनांना वाचवण्याचं पाप सुरु आहे’; चित्रा वाघ यांचा घणाघात

अशी करा Omicronवर मात; अदर पुनावाला यांनी शेअर केलं ‘ते’ सिक्रेट

‘आपण सर्वात वाईट टप्प्यातून जाऊ शकतो’; Omicronविषयी बिल गेट्सचा धक्कादायक इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More