Top News महाराष्ट्र मुंबई

“…तर ही धर्मांधता म्हणजे वैचारिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल”

मुंबई | 2015 मध्ये फ्रान्समधील शार्ली हेब्दो या मासिकात छापून आलेलं मोहम्मद पैगंबरांचं व्यंगचित्र, इतिहासाचे शिक्षक सॅम्युअल पॅटी यांनी विद्यार्थ्यांना दाखवलं. यावरून या शिक्षकाची 16 ऑक्टोबरला गळा चिरून हत्या झाली. त्यावरून शिवसेनेनं धर्माच्या नावाखाली अधर्मी कृत्ये करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

कोणता धर्म अशाप्रकारे माणसाची कत्तल करण्याची परवानगी देतो पण धर्माचं नाव घेऊन अर्धम करणाऱ्या अशा कृत्यांना जिहादचे नाव देऊन त्यालाच कोणी धर्म म्हणत असेल तर ही धर्मांधता म्हणजे वैचारीक दिवाळखोरीच म्हणावी लागेल, असं शिवसेनेनं म्हटलंय.

धर्म कुठलाही असो, ‘माणुसकी’ हाच त्याचा गाभा आणि मुख्य आधार असायला हवा. माणसे मारण्याच्या अमानुषतेला धर्मात स्थान असूच शकत नाही. त्यामुळेच तर प्रत्येक धर्म माणुसकी, प्रेम, सेवा, त्याग अशा मूल्यांची शिकवण देतो, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

1789 मध्ये झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीतून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची शिकवण फ्रान्सने जगाला दिली. त्याच फ्रान्समध्ये आता राजरोसपणे बंधुभावाचा मुडदा पडताना दिसतो आहे, असं शिवसेनेनं म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्र्यांवर 12 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, राज्यपालांकडे चौकशीची मागणी

विधानपरिषदेसाठी उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेला होकार!

‘मी 3 वर्षांची असताना….’; अभिनेत्री फातिमा सना शेखचा खळबळजनक गौप्यस्फोट

“भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले, आपण पक्ष सोडल्याने अनागोंदी माजणार नाही”

“कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी एसटीची मालमत्ता गहाण ठेवणं महाराष्ट्राला शोभत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या