बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी मागितली जाहीर माफी, पाहा व्हिडीओ!

मुंबई | अभिनेते- निर्माते महेश कोठारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर माफी मागितली आहे. मात्र त्यांनी अशी जाहीर माफी का मागितली असा अनेकांना प्रश्न पडला आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील स्त्री पात्राच्या कपड्यांवर गौतम बुद्धांचं चित्र दाखवल्याप्रकरणी मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे.

स्टार प्रवाहावर महेश कोठारे यांची प्रदर्शित होणाऱ्या ‘सुख म्हणजे काय असतं’ ही मालिका सुरु आहे. या मराठी मालिकेला प्रेक्षकांचाही प्रतिसाद भरपूर पाहायला मिळतो. मात्र या मालिकेच्या एका भागात एका महिला पात्रासाठी, एक निळ्या रंगाचा ब्लाऊज देण्यात आला होता त्यावर पांढर्‍या रंगामध्ये गाौतम बुद्धांचे चित्र छापण्यात आलेले होते. त्यामुळे अनेकांनी भावना दुखावल्याचा आरोप करत मालिकेवर टीका केली होती. त्यानंतर महेश कोठारे यांनी माफी मागितली आहे.

महेश कोठारे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ही जाहीर माफी मागितली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 14 सप्टेंबर रोजी प्रदर्शीत झालेल्या भागात आमच्याकडून जी चूक घडली आहे. त्याबद्दल मी, मालिकेची संपूर्ण टीम, मालिकेतील सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ या सर्वांच्या वतीनं मी जाहीरपणे तुमची माफी मागतो. यापुढे आमच्याकडून अशा प्रकारची कोणतीही चूक घडणार नाही अशी खात्रीही त्यांनी दिली आहे.

दरम्यान, गौतम बुद्धांचे चित्र पाहून वाहिनीचे संचालक, निर्माते आणि ड्रेस डिझायनर यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रिपाइं एकतावादीचे नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी केली होती. त्यामुळे आता या संदर्भात महेश कोठारे यांनी संपूर्ण टीमकडून जाहीर माफी मागितली आहे.

 

थोडक्यात बातम्या –  

मनोज पाटीलनं केलेल्या गंभीर आरोपानंतर अभिनेता साहिल खानला अटक!

‘माझे भावी सहकारी…’; भाजपसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

पंतप्रधान मोदींमुळे रांगेतील शेवटच्या व्यक्तीचं कल्याण झालं- चंद्रकांत पाटील

भररस्त्यात डान्स केल्यामुळे माॅडेलवर गुन्हा दाखल, पाहा व्हिडीओ!

…तर आपण कोरोनाची लढाई जिंकू शकतो- निती आयोग

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More