बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून शेवटचा पर्याय म्हणून लाॅकडाऊनचा विचार करावा लागतोय”- राजेश टोपे

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात लाॅकडाऊनच्या हालचाली चालू झाल्या. यादरम्यान मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधून मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करून कोरोनाशी लढू  आणि लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून वापरण्यात यावा असा सल्ला दिला होता. याच पार्श्वभूमीवर आता लाॅकडाऊनबाबत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केलं आहे.

राजेश टोपे यांनी मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात कोरोनाबाधीत रुग्णसंख्या रोज 70 हजारांपर्यंत जात आहे. याच कारणामुळे आता महाराष्ट्रात लाॅकडाऊन करण्याचा विचार करावा लागत आहे. रुग्णसंख्या पाहून आता नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे लाॅकडाऊन हाच शेवटचा पर्याय आहे. तसेच ब्रेक द चेनच्या अंतर्गत निर्बंध लागू करुन बऱ्याच गोष्टी बंद करण्यात आल्या आहेत. यातच आता ब्रेक द चेन अंतर्गत घालण्यात आलेल्या निर्बंधांत आणखी निर्बंध वाढवले जातील आणि ती आजच्या काळाची गरज असल्याचं देखील टोपे म्हणाले.

राजेश टोपे यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक उदाहरण दिलं होतं. ब्रिटनमध्ये कालच्या तारखेत केवळ दोन मृत्यू झाले. याचं कारण म्हणजे त्यांनी तीन महिने लॉकडाऊन ठेवला आणि देशातील 60 टक्के लोकांचं लसीकरण करून घेतलं. या कारणामुळे हर्ड इम्युनिटी त्यांच्यात आली आहे. तसेच मृत्यूचं प्रमाण देखील कमी आहे. यादरम्यान आपल्याला देखील तिच स्ट्रॅटजी अवलंबावी लागेल आणि पुढील 15 दिवसांत कडक लॉकडाऊन करुन मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवायची, असं देखील टोपे म्हणाले.

दरम्यान, लसीकरणासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याचं आणि पुढे आणण्याचं काम आपण करु, असं टोपे म्हणाले. 18 ते 45 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी केंद्रानं लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारांवर सोपवली आहे, त्याचं देखील आव्हान आपण स्वीकारू तसेच देशात अथवा देशाच्या बाहेर जिथून मिळेल तिथून लस घेऊन आपण लसीकरण करू आणि त्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं देखील यावेळी आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

थोडक्यात बातम्या-

“उंटाच्या तोंडाचा मुका घ्यायची धडपड करू नका, आम्ही चंपा बोललो तर तुमचं मानसिक संतुलन ढासळतं”

नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती; 22 जणांचा मृत्यू

‘हा कठीण काळ आहे’; मालदीवमध्ये एन्जॉय करणाऱ्या सेलिब्रिटींवर श्रुती हासन भडकली

राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांसाठी ‘सीरम’ने जाहीर केल्या कोविशिल्ड लसीच्या किंमती

महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More