Top News देश

‘…अन्यथा आम्ही कृषी कायद्यांवर बंदी घालू’; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं

नवी दिल्ली | शेतकऱ्यांशी चर्चा चालू असल्याचं केंद्र सरकार सांगत आहे. कोणती चर्चा सुरु आहे? सरकार ज्याप्रकारे चर्चा करत आहे त्यावर आम्ही खूपच निराश आहोत, अशा शब्दात सर्वोच्च न्यायाधीश शरद बोबडे यांनी केंद्र सरकारला सुनावलं आहे.

कृषी कायद्यांशी संबंधित सर्व प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडत आहे. यादरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलं आहे.

कायद्याची अंमलबजावणी काही काळासाठी सरकारने तहकूब करावी, असं आम्ही सांगितलं होतं. पण सरकारने आमचं म्हणणं ऐकलं नाही. काय अडचण आहे, कायद्याची अंमलबजावणी करण्यावर सरकार ठाम का आहे?, असा प्रश्नही न्यायलयाने सरकारला विचारला आहे.

कृषी कायद्यांची स्तुती करणारी एकही याचिका आमच्याकडे आलेली नाही. शेतकऱ्यांच्या विषयाबद्दल न्यायालय तज्ज्ञ नाही. पण, तुम्ही या कायद्यांची अंमलबजावणी थांबवणार आहात की, आम्ही पावलं उचलायची? परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लोकांचा मृत्यू होत आहे. थंडीत बसले आहेत. तिथे अन्नपाणी पाण्याची काय व्यवस्था आहे?, असंही न्यायालयाने सरकारला विचारलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही- नारायण राणे

पुण्यात अपघातांचं सत्र सुरुच, सकाळपासून एकापाठोपाठ चार अपघात

चेंडू छेडछाडीनंतर हे वाईट कृत्य करताना स्मिथ सापडला रंगेहात; पाहा व्हीडीओ

पंचांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार पेनला आयसीसीने दिला झटका!

खळबळजनक! नालासोपाऱ्यात घराबाहेर पाण्याचा पाईप लावण्यासाठी गेलेल्या मुलीला उचलून तिच्यावर बलात्कार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या