मुंबई | बाळासाहेब ठाकरेंच्या(Balasaheb Thackeray) जयंतीचे औचित्य साधून प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) युती जाहीर केली. परंतु प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांबाबत(Sharad Pawar) केलेल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण झाला आहे.
या वादामुळं प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषेद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी आंबेडकर म्हणाले की, कोणतेही राजकीय पक्ष एकमेकांचे शत्रू नसतात. सगळेच भारतीय पक्ष आहेत.
परंतु राजकीय पक्षांमध्ये टोकाचे मतभेद असू शकतात. आमच्यात आणि भाजपमध्येही टोकाचे मतभेद आहेत. याआधीही आमच्यातील मतभेद समोर आले आहेत, असं आंबेडकर म्हणाले.
आरएसएस आणि भाजप मनुस्मृतीला मानतो. आमचा लढा हा मनुस्मृतीच्या विरोधात आहे. जर भाजपनं मनुस्मृती सोडला आणि भाजप घटनेनुसार काम करायला लागले तर आम्ही भाजपसोबतही जाऊ, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले.
दरम्यान, पुढं ते असंही म्हणाले की, जो बदल सरदार पटेल यांनी केला तो भाजपनं मनानं स्विकारावा. मग भाजप आमचा शत्रू राहणार नाही.
महत्वाच्या बातम्या-
- शाहरूखच्या पठाण चित्रपटानं दोन दिवसांत केली तब्बल ‘इतक्या’ रूपयांची कमाई
- ऐन थंडीत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
- खासदार ओमराजे निंबाळकरांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!
- सतर्क! ‘या’ जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता
- ‘मेरा मुन्ना…’; बॉयफ्रेंडसाठी तिने लिहलेलं लव्हलेटर वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही