बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर आम्ही इथवर पोहोचलोच नसतो”; ज्येष्ठ दिग्दर्शकाची भावूक पोस्ट

मुंबई | मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ दिग्ददर्शक केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत केदार शिंदे यांनी मराठातील एका अभिनेत्याबाबत भरभरून लिहिलेलं आहे. मराठी सिनेक्षेत्रातील नावाजलेले अभिनेते भरत जाधव, अंकुश चौधरी आणि जयराज नायर यांच्यासोबतचा हा फोटो आहे.

जयराज नायर हा मराठी माणूस आहे. हा जो फोटो आहे आम्ही तिघांनी विनंती करून काढला आहे. कारण आमच्या प्रवासात तो नसता तर आम्ही इथंवर पोहोचलो नसतो, असं केदार शिंदे यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. मी त्याला भेटलो तेव्हा फक्त तीन वर्षांचा असेन. शाहीर साबळे आणि पार्टी मध्ये हौशी कलाकार म्हणून त्याची एन्ट्री झाली, असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे प्रत्येक बाबांच्या मुक्तनाट्यात त्याचा सहभाग होता. ठाण्याच्या गरवारे कंपनीची नोकरी सांभाळून तो त्याचा कलेचा प्रवास करत होता. माझं कळतं वय झालं तोवर तो आमच्या घराचा मेंबर झाला होता. मी जयराज मामा म्हणतो त्याला. अजुनही, असं केदार शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केदार शिंदे यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. बकुळा नामदेव घोटाळे, अगं बाई अरेच्या, यंदा कर्तव्य आहे, अशा चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. इन्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मी व्यावसायिक रंगभूमीवर धडपडत असतानाचं त्यांची कंपनी सुटली. वयाने खुप मोठा असतानाही कुठलाही आडपडदा न ठेवता आमच्यात सहभागी झाला, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पाहा पोस्ट-  

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

थोडक्यात बातम्या- 

देशाच्या राजकारणात खळबळ! शरद पवारांच्या पुढाकाराने मुंबईत मोठी बैठक होणार

“हनुमान चालिसाच्या दोन ओळी म्हणता येत नाहीत अन्…”

“गुणरत्न सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्याला ‘इतक्या’ लाखांचं बक्षिस”

Raj Thackeray | ‘3 तारखेनंतर भोंगे हटवले नाहीत तर…’; राज ठाकरेंचा इशारा

पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी केल्या ‘या’ दोन मोठ्या घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More