बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एकेरी उल्लेख करता, तुमचं कर्तृत्व काय?”, संजय राऊतांनी घेतला पडळकरांचा समाचार

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा (ST workers) संप सुरू आहे. दिवसेंदिवस या संपाचा विषय अजूनच चिघळत चालला आहे. ऐतिहासिक पगारवाढीनंतरही हा संप मागे घेण्यास कर्मचारी तयार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केल्यानं एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

कामगारांच्या संपाला पाठिंबा देणारे राजकीय पक्ष आणि कामगारांचे नेतेच जर हा संप चिघळवत असतील तर ते हजारो कुटुंबाचं नुकसान करत आहेत, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी यावेळी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांना लगावला.

पडळकरांनी केलेल्या एकेरी उल्लेखाबद्दल राऊतांनी त्यांना यावेळी खडसावलं. महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांबद्दल मीडियासमोर, कामगारांसमोर एकेरी उल्लेख करता, तुमचं कर्तृत्व काय आहे, अशा शब्दांत राऊतांनी पडळकरांचा समाचार घेतला आहे. एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का? असं करू नका. कामगारंच्या लढ्यातून आम्हाला मुंबई मिळाली आहे. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री आम्ही सगळेच कामगारांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली असल्याचं संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले, राज्याची आर्थिक स्थिती नसताना देखील एसटी कर्मचाऱ्यांना पाठबळ मिळावं आणि या संपातून तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने चांगलं पॅकेज दिलं आहे. कमीतकमी 5 हजार रुपये पगारवाढ व्हावी अशी तरतूद राज्य सरकार करणार असल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

“शशिकांत शिंदेंना ठरवूनच पाडलं, शिंदेंचा विजय झाला असता तर…”

“आता महिलांनी घरकोंबड्या सरकारसारखं घरातच बसायचं का?”

’26/11 हल्ल्यावेळी परमबीर सिंहांनी कसाबला मदत केली’, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या आरोपाने खळबळ

मोठी बातमी! संपत्ती जप्त होण्याआधीच फरार परमबीर सिंह मुंबईत दाखल

‘दोन दिवसांत कामावर रुजू न झाल्यास…’; प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टीमेटम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More