बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…..म्हणून लसीकरणासाठी WHO ने भारताकडे मागितली मदत

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा कहर अगदी भयावह करणारा आहे. कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक वाढत चाललाय. देशभरातील अनेक कोरोना योद्धे गेल्या वर्षभरापासून कोरोनापासून आपल्याला वाचवण्यासाठी लढत आहेत. सध्या कोरोना काळात लसीकरणाचा तुटवटा जाणवत आहे. अशातच लसीकरणासाठी WHO ने भारताकडे मदत मागितली आहे.

देशांमध्ये लसींच्या तुटवड्यामुळे लसीचा दुसरा डोस देताना अडचणी येत आहेत. त्यामुळे WHO म्हणजेच  जागतिक आरोग्य संघटनेनी जागतिक स्तरावरील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी भारताकडे आणि सीरम संस्थेकडे मदत मागितली आहे.

सीरम इंस्टीट्यूट ही अॅस्ट्राझेनेकाच्या कोविशिल्ड लसीची जगातील सर्वात मोठी उत्पादक आहे. कोविशिल्ड लसीचा एक डोस दिल्यानंतर अनेक देशांमध्ये दुसर्‍या डोसची कमतरता आहे. ही कमतरता 30 ते 40 देशांमध्ये आहे. यावर मात करण्यासाठी भारत सरकार आणि सीरम इंस्टीट्यूटकडे ही लस देण्यासाठी मदत मागण्यात आली आहे.

दरम्यान,  आफ्रिका, लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशिया या देशांमध्ये लसीची कमतरता आहे असे जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ सल्लागार ब्रूस आइलवर्ड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

नाशिक दुर्घटनेत मुलाच्या मृत्यूनंतर सरकारने दिलेले 10 लाख रुपये घेऊन सून फरार

“कोणी कितीही शड्डू ठोकले तरी पुढील महापौर सुद्धा शिवसेनेचाच होणार”

कौतुकास्पद! वृद्ध महिलेच्या गळणाऱ्या झोपडीसाठी सरसावले पोलिस

गंगा नदीने पुन्हा धारण केलं रौद्र रुप, भगवान शंकराच्या मुर्तीला स्पर्श करतंय पाणी

बेघर लाभार्थ्यांना जागा ताब्यात मिळवुन देण्यासाठी जमिनीत अर्ध दफन होऊन अनोखं आंदोलन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More