बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून मलिकांसोबत रोज घरी बायका पोरं भांडतात- आमदार सातपुते

सोलापूर | मराठा समाजाचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय टीकाटिप्पणीला चांगलंच उधाण आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर मराठा आरक्षणावरून टीका करत आहेत. त्यातच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार हे ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवत असल्याची खोचक टीका केली होती. त्यामध्ये त्यांनी सर्वच जर केंद्राने करायचं असेल तर मग राज्याने काय माशा मारायच्या का? असा प्रश्न देखील उपस्थित केला होता.

यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीस यांना उत्तर देताना माशा मारण्याशिवाय तुमच्याकडे कामच काय उरलं आहे? असा टोला लगावला होता. ‘आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करतोय आणि यापुढेही करत राहू, तुम्ही माशा मारण्याचा आनंद घ्या, गरज पडल्यास त्याच्या स्पर्धाही भरवा’, असा सल्ला नवाब मलिक यांनी दिला होता.

या प्रकरणात आता माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार राम सातपुते यांनी उडी घेतली असून त्यांनी नवाब मलिक यांच्यावर टीकेची तोफ डागल्याचं पाहायला मिळालं. आमदार राम सातपुते यांनी ट्विट करत “आम्ही समजू शकतो मलिकजी आपण मंत्री असताना आपला जावई ड्रग केसमध्ये तुरुंगात आहे, आपण रोज घरी गेलात की बायका पोरं भांडत असतील आणि म्हणत असतील जावयाला बाहेर काढू शकत नाही, असो.. आपली अवस्था मी समजू शकतो. मला तर वाटतं आपण मनोरूग्ण झाला आहात, सांभाळा स्वतःला”,  अशा शब्दात नवाब मलिक यांच्यावर टीकेची झोड उठवली.

आमदार राम सातपुते यांनी नवाब मलिक यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता नवाब मलिक त्याला कसं प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मात्र महाराष्ट्रातील राजकारणात अनेक टीकाटिप्पणी होत असताना पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

झाडं लावून झाडांच्या मुळांशी अस्थीविसर्जन, वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी मुलीचा स्तुत्य निर्णय

‘तुम्ही भारताची जी निंदा करताय त्यानं मला रडू येतंय’; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचं भारत प्रेम

DRDO चं ‘हे’ ॲंन्टी कोव्हिड औषध आजपासून बाजारात उपलब्ध शास्त्रज्ञ म्हणाले…

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाला…

‘या’ कंपनीकडून ग्राहकांना मिळणार फ्री रिचार्ज; कोरोनाकाळात ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More