बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर तुम्ही केंद्र सरकारलाही देशद्रोही म्हणणार का?- रघुराम राजन

नवी दिल्ली | देशातील कोरोना परिस्थितीवर जगातील तज्ज्ञ आपली मतं मांडत असतात. रिझर्व बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. केंद्र सरकार आणि रघुराम राजन यांच्यात वैचारिक वाद कायम रंगलेला आपण पाहिला आहे. रघुराम राजन यांनी पांचजन्यच्या मुद्द्यांवर आपली मतं मांडली.

आरएसएस पुरस्कृत पांचजन्य साप्ताहिकाने इंन्फोसिसवर गंभीर आरोप केले होते. अर्थमंत्रालयाने इंन्फोसिसच्या मदतीने कर भरना पोर्टल तयार केलं आहे. या पोर्टलवरून जीएसटी भरताना करदात्यांना भरपूर त्रास सहन करावा लागला होता. म्हणून पांचजन्य या साप्ताहिकातून इन्फोसिसवर देश विघातक शक्तींना मदत करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर देशातील राजकारण ढवळून निघालं होतं.

माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना या प्रकरणाबाबत विचारलं असता त्यांनी आपली मतं मांडली आहेत. पांचजन्यने केलेली टीका चुकीची आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या पहील्या लाटेत वाईट कामगिरी केली म्हणून आपण केंद्र सरकारला देशद्रोही म्हणाणार का?, असा सवाल राजन यांनी केला आहे.

केंद्र सरकारची कामगिरी वाईट होती हे आपल्याला माहित आहे. आताही जीेेएसटी संकल्पना मला भावणारी नाही, असंही केंद्र सरकारला राजन यांनी टोला लगावला आहे. केंद्र सरकारने जीएसटी संदर्भात योग्य आखणी करण्याची गरज असल्याचं मत राजन यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. सर्व हेवे-दावे विसरून केंद्र सरकारने जीएसटी व्यापक करण्यावर भर देण्याचा सल्ला राजन यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

थोडक्यात बातम्या 

महिन्याला फक्त 1000 रूपये जमा करा, काही वर्षांनी मिळतील तब्बल 12 लाख रूपये

काळजी घ्या! कोरोनासारखं डेंग्यूही बदलतोय आपलं रुप; धक्कादायक माहिती समोर

…तर मला सामनाचं काम सोडावं लागेल- संजय राऊत

“मायबाप सरकार खरं बोला, पेगॅसस वापरलं की नाही?”

कोरोना कधी संपणार?; WHO नं दिलेल्या उत्तरानं जगाचं टेंशन वाढवलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More