…तर तुमचं पॅनकार्डही होऊ शकतं बंद, आताच करून घ्या ‘हे’ काम!

मुंबई | आता बॅंकेतील(Bank) बऱ्याच कामांसाठी पॅनकार्ड(PAN Card) अनिवार्य झालं आहे. तसेच पॅनकार्डचा फोटो ओळखपत्र म्हणूनही वापरण्यात येतो. आता पॅनकार्ड हे महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. त्यातच आता पॅनकार्ड होल्डरसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

जर तुमच्याकडं पॅनकार्ड असेन आणि जर पॅनकार्ड आधार कार्डशी(Aadhar Card) लिंक केलं नसेल तर तुमचं पॅनकार्ड कायमस्वरूपी बंद केलं होऊ शकतं. पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी मार्च 2023 पर्यंतची मुदत आयकर विभागाकडून(Income Tax Department) देण्यात आली आहे.

तसेच 30 जूननंतर जर तुम्ही पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्यास गेला तर तुम्हाला एक हजार रूपयांचा दंड भरावा लागणार आहे. हा दंड भरल्याशिवाय कोणालाही पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करता येणार नाही.

जर तुमचं पॅनकार्ड लाॅक झालं तर ग्राहकांना मुच्युअल फंड अकाऊंट तसेच शेअर अकाऊंट उघडता येणार नाही. त्यामुळं लवकरात लवकर सर्वांनी पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करून घेणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही इनकम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइटवरून लाॅग इन करू शकता.

जर मार्चनंतर तुमचं पॅनकार्ड बंद पडलं आणि लाॅक पॅनकार्डचा तुम्ही कुठं वापर केला तर तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो. यासाठी तुम्हाला दहा हजार रूपयांचा दंडही पडू शकतो.

दरम्यान, मोदी सरकरानं पॅनकार्ड बॅंकेशी जोडल्यानं पॅनकार्डला अत्यंत महत्व प्राप्त झालं आहे. केवळ पॅनकार्डच्या नंबरवर तुमची बॅंकेबद्दलची सर्व माहिती उपलब्ध होत असते. त्यामुळं सर्वांनी पॅनकार्ड आधार कार्डशी जोडून घेणं गरजेचं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More