बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अतिश्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीवर 2 टक्के कोरोना कर लावा; देशातल्या विचारवंतांची मागणी

मुंबई |  कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे देश आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत अतिश्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीवर 2 टक्के कोरोना कर लावा, अशी मागणी देशातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी तसंच बुद्धीजिवी विचारवंतांनी केली आहे.

डॉ. जी. जी. पारिख, मेधा पाटकर, अरुणा रॉय, अनिल सद्गोपाल, डुनु रॉय, जिग्नेश मेवानी, माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील, प्रा. सुभाष वारे, नीरज जैन या सर्व कार्यकर्ते आणि विचारवंतांनी सर्वांत श्रीमंत 1 टक्के लोकांच्या संपत्तीवर 2 टक्के आपत्कालीन कोरोना कर लावावा, अशी मागणी केली आहे.

त्यांच्या या मागणीच्या पाठिंब्यासाठी देशातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, बुद्धिजीवी व वैज्ञानिक यांच्या संयुक्त विद्यमाने लोकांच्या स्वाक्षर्‍यांसाठी सोशल मीडियावर मोहिम चालवली जात आहे.  फक्त लॉकडाऊन हा कोरोनावरचा इलाज नाही तर सर्व कोरोना व्हायरस संक्रमितांना ओळखण्यासाठी लक्षणे असो किंवा नसो, चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवून त्यानंतर त्यांचे विलगीकरण करणे, त्यांची प्रकृती खालावल्यास त्यांच्यावर उपचाराची व्यवस्था करणे हाच कोरोनाला पराभूत करण्याचा एकमेव मार्ग आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

भारताची लोकसंख्या अवाढव्य असताना एवढ्या लोकांची तपासणी कशी होणार? एकीकडे चाचण्या कमी होत आहेत, तर  दुसरीकडे लॉकडाऊनचा फटका देशातील अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना बसला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या या आर्थिक संकटात रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि कामगार अडचणीत आले आहेत. लॉकडाऊनमुळे कोट्यावधी लोकांचे रोजगार अचानकपणे गेले आहेत. ते सध्या उपासमारीच्या मार्गावर आहेत. यातील बहुसंख्य लोक असंघटित क्षेत्रात काम करतात, जे देशातील एकूण कार्यशक्तीच्या 93% आहेत, असंही या सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

देश कोरोनाच्या संकटात असताना पेट्रोल डिझेलवरचं उत्पादन शुल्क वाढवणं चुकीचं- राहुल गांधी

आणखी बळी जातील पण अर्थव्यवस्थेला चालना देणं महत्वाचं- डोनाल्ड ट्रम्प

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना घरी सोडण्यासाठी एस.टी. धावणार- परिवहनमंत्री

आजच्या घडीला जग कठीण परिस्थितीतून जात असताना बुद्धाची शिकवण मार्गदर्शक ठरेल- राज्यपाल

पुण्यात आज कोरोनाचे किती रुग्ण सापडले?; वाचा किती रुग्णांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More