मुंबई | राज्यात दहा पॉझिटिव्ह रुग्ण निश्चित झाले आहेत यांपैकी पुण्यात आठ तर मुंबईत दोन रुग्णांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
कोणी घाबरुन जाण्याचं कारण नाही केवळ दक्षता घेणं गरजेचं आहे, असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं आहे. ते मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यात 10 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मात्र त्यांना त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसतं नाही. एखादा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला म्हणजे घाबरुन जाण्याचं कारण नाही. मात्र याबाबत दक्षता घेणं गरजेचं आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
1 मार्च रोजी पर्यटकांचा जो 40 जणांचा ग्रुप होता त्यांच्याशी संबंधीत 9 लोकांनाच ही बाधा झाली आहे. यांपैकी उर्वरित 30 जणांशी संपर्क साधण्यात आला आहे. यांच्यामार्फत पुण्यात 8 जणांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. यांपैकी काहींमध्ये विशेष लक्षणंही दिसून आलेली नाहीत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
ज्योतिरादित्य म्हणजे माझ्या घरी कोणत्याही क्षणी येऊ शकते अशी व्यक्ती होती- राहुल गांधी
“कारस्थानी काँग्रेसवाल्यांनी एका चांगल्या नेत्याची कोंडी केली; राहुल गांधींचं हे मोठं अपयश”
महत्वाच्या बातम्या-
सरकारने मास्क आणि हॅन्ड वॉश रेशन दुकानातून द्यावेत- चंद्रकांत पाटील
मास्क लावण्याची गरज नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हा संयुक्त महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे का? देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत संतप्त सवाल
Comments are closed.