बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘एका चेंडूत सर्वाधिक बळी घेणारे भास्कर जाधव’; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

मुंबई | महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन कालावधी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला होता. तेव्हापासूनच सरकारवर विरोधी पक्षातर्फे टीकेची झोड उठल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकार विरुद्ध भाजप असा मोठा संघर्ष पाहायला मिळाला.

अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी तसेच शिवीगाळ गेल्या प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचे 1 वर्षासाठी निलंबन करण्याचा निर्णय तालीका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी घेतला. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच एका चेंडूत सर्वाधिक बळी घेणारे भास्कर जाधव म्हणून त्यांच्या नावाची चर्चा समाज माध्यमांवर सुरू आहे. तसेच त्यांची तुलना सर्वाधिक बळी घेणाऱ्या क्रिकेटपटूंशी करण्यात येत आहे.

भास्कर जाधव यांचा क्रिकेटची बॅट हातात घेऊन फोटोदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या बरोबरच भास्कर जाधव यांनी भाजप आमदारांवर शिवीगाळ करण्याचा आरोपही केला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता भास्कर जाधव यांचा जुना एक शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ भाजप समर्थकांकडून व्हायरल करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणात भाजपचे निलंबित 12 आमदार हे आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आज अधिवेशनात नेमका कोणता मुद्दा गाजणार आणि आज विरोधी पक्ष नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More