मुंबई | देशातील तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच वेड लावणाऱ्या टीकटॉक अॅपवर अनेक जण काही सेकंदाचा व्हिडीओ तयार करत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूप व्हायरल होतात. गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर धूमाकूळ घालत होता. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती असल्या कारणाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांच्या व्हॉट्स अॅप स्टेटसवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये खास कारण आहे 4 मुस्लीम मुलं आणि एक मुस्लीम मुलगी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन येताना दिसत आहेत.
4 मुलं आणि 1 मुलीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओला ‘तानाजी’ चित्रपटाचं म्युझिक वापरण्यात आलं आहे. हा व्हिडीओ जोया या नावाने टिकटॉक अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ शिवजयंती असल्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवप्रेमींचा या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
— Sangram Dhokale (@DhokaleSangram) February 18, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
अहो फडणवीस, राज्याची काय पूर्ण देशाची निवडणूक परत घ्या; पवारांचं फडणवीसांना आव्हान
अखेर इंदोरीकर महाराजांची माघार; व्यक्त केली दिलगिरी!
महत्वाच्या बातम्या-
“भारत-पाकिस्तान एकमेकांचे कांदे, बटाटे खाऊ शकतात मग क्रिकेट सामना खेळायला नकार का?”
विनोदाचार्य निर्माण होणे ही कीर्तन परंपरेची अधोगती- सदानंद मोरे
माफी मागितली तरी इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल व्हायला हवा- तृप्ती देसाई
Comments are closed.