देश राजकारण

“अमित शहांच्या डोक्यात दिवसरात्र फक्त सरकार पाडण्याचा विचार चालू असतो”

जयपूर | कर्नाटक, मध्यप्रदेश, मणीपूर किंवा गोव्यातील सरकार पाडण्यात नेहमी अमित शहांचं नाव आघाडीवर राहिलं आहे. यामुळे कदाचित मला नाईलाजास्तव म्हणावं लागतंय की अमितजी नक्की तुम्हाला झालंय तरी काय?, दिवसरात्र फक्त सरकार पाडण्याचाच विचार तुमच्या डोक्यात चालू असतो, अशा शब्दात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अमित शहांवर निशाणा साधला आहे.

अमित शहांवर टीका करताना गेहलोत ट्विटरवरून म्हणाले की, लोकांनी निवडून दिलेली सरकारं जर भाजप अनैतिक मार्गाने पाडत असेल. तर लोकशाही नावापुरती तरी राहिल का? पक्ष निवडून येतात तर कधी पडतात. सरकार बनतं तर कधी बनत नाही. मात्र लोकशाही नसेल तर देशाला धोका पोहचेल.

आपल्या सर्वांचं एक नागरिक म्हणून कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधी, न्यायालय, पत्रकार या सर्वांनीच लोकशाहीला वाचविण्यासाठी नेहमी पुढं यायला हवं, असं आवाहनही गेहलोत यांनी यावेळेस दिलं आहे.

दरम्यान, भाजपकडून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केला जातोय, असा आरोप वारंवार गेहलोत यांच्याकडून करण्यात येत आहे. सचिन पायलट यांचा गट काँग्रेसमधून फुटल्यानंतर राजस्थानचं राजकारण एका नव्या वळणावर जाऊन पोहचलं आहे. या परिस्थितीत राज्याच्या राजकारणात कोण सरस ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपचे 40 आमदार आमच्या संपर्कात, यादी तयार- बच्चू कडू

“बोलता बोलता सरकारचे 5 वर्ष कधी पूर्ण होतील हे भाजपला कळणार पण नाही”

सुशांत आत्महत्या करूच शकत नाही; अंकिता लोखंडेनं केले अनेक धक्कादायक खुलासे

दूध दराचे श्रेय घेण्यासाठी भाजप आंदोलन करतंय- रोहित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या