सोलापुर | शरद पवारांचाच प्रचार करायचाय तर भाजपमुळे मिळालेली पदं सोडा, अशा शब्दात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरचे पालकमंत्री विजय देशमुख यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात झालेल्या महत्वाच्या बैठकीला पालकमंत्री गटाने दांडी मारली. या घडलेल्या प्रकारावर सुभाष देशमुख चांगलेच संतापले.
सुभाष देशमुखांनी सोलापुर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे आणि विजय देशमुख यांचं नाव न घेता त्यांचा यथेच्छ समाचार घेतला आहे.
दरम्यान, सोलापुरमध्ये ‘सहकारमंत्री आणि पालकमंत्री’ अशा दोन गटातील गटबाजी सातत्याने समोर येत आहे. झालेल्या प्रकारामुळे सोलापुर भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
–‘पवारांचा नातू आणि विखेंच्या मुलाची भेट’; या अनोख्या आघाडीचा अर्थ काय?
–शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा काँग्रेस आमदार अब्दुल सत्तारांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव!
-“नरेंद्र मोदी क्लासचे टॉपर तर राहुल गांधी नापास विद्यार्थी”
–‘ठाकरे’ चित्रपट पाहून छगन भुजबळांना दाटुन आल्या शिवसेनेतल्या आठवणी!
–भाजप म्हणतंय, राहुल गांधींना खोटं बोलण्यातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा!