बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून सोलापूर महापालिका आयुक्त दिपक तावरे यांची बदली, त्यांच्या जागी या अधिकाऱ्याची वर्णी

सोलापूर | सोलापुरातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अशा परिस्थितीत सोलापूर महापालिका आयुक्त दीपक तावरे यांची बदली करण्यात आली असून पी सिवा शंकर यांना सोलापूर महापालिका आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

सोलापूरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. शुक्रवारी सकाळी कोरोना बाधितांची संख्या ही आठशेच्यावर गेली आहे. अशा परिस्थितीत महापालिका आयुक्त दीपक तावरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पी. सिवा शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सिवा शंकर हे मागील एक महिन्यापासून सोलापूर शहरात आहेत. अतिरिक्त अधिकारी म्हणून त्यांना सोलापूरात पाठविण्यात आले होते. मात्र आता त्यांना कायमस्वरूपी महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. दिपक तावरे यांना वखार महामंडळाचे कार्यकारी संचालक या पदावर बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, दीपक तावरे यांची बदली करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सकाळी अजित कुलकर्णी यांच्याशी बोलताना बदलीचे संकेत दिले होते. त्यानुसार काल संध्याकाळी तावरे यांची बदली करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

जिल्ह्याची हद्द ओलांडणं संभाजी भिडेंना महागात; पोलिसांत गुन्हा दाखल

राज्यात आज 8381 रूग्ण ठणठणीत होऊन घरी… बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येचा आज उच्चांक!

महत्वाच्या बातम्या-

ही 13 शहरं अजूनही बंदिस्त राहणार, बाकीकडे लॉकडाऊन शिथील होणार…!

लस शोधली तरी…. कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर

शाळा कधी सुरू होणार?, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली तारीख

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More