बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अखेर अटक!

सोलापूर | उपायुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अखेर अटक करण्यात आली आहे.

29 डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यापासून राजेश काळे फरार होते. पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पुण्यावरुन पाठलाग करत काळे यांना टेंभूर्णी परिसरात अटक केली आहे.

राजेश काळे यांच्या शोधासाठी सदर बझार पोलिसांकडून वेगवेगळ्या ठिकाणी पथकं रवाना करण्यात आली होती. आज अखेर त्यांना टेंभूर्णीजवळ अटक करण्यात आली आहे.

भाजपतील काही लोकांनीच माझ्याविरूद्ध षडयंत्र रचल्याचा राजेश काळे यांनी आरोप केला आहे. मी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आहे मात्र खंडणी मागितली नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

राजीनाम्याच्या वृत्तावर बाळासाहेब थोरातांचा खुलासा म्हणाले…

‘…तोपर्यंत आम्ही घरी परत जाणार नाही; शेतकरी आक्रमक

भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल!

शेतकरी मागणीवर ठाम; थंडी-पावसातही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु

मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More