solapur Loksabha l सध्या लोकसभा निवडणुकीचा निकाल सुरु आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे. अशातच सर्व राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर निवडणुकीतून मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली आहे.
प्रणिती शिंदे आघाडीवर :
सोलापूरमध्ये राम सातपुते आणि प्रणिती शिंदे असा सामना रंगला होता. मात्र अशातच आता प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली असल्याने राम सातपुते यांचं टेन्शन वाढलं आहे. राम सातपुते हे सध्या पिछाडीवर आहे.
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सोलापुरात प्रणिती शिंदे या आघाडीवर आहेत. त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढलं आहे. मात्र निकालदरम्यान काय घडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागणार आहे.
solapur Loksabha l सोलापूर मतदारसंघात मतदान झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे :
मोहोळ 63.15, सोलापूर शहर उत्तर 59.15, अक्कलकोट 59.17, सोलापूर दक्षिण 58.28, सोलापूर शहर मध्य 56.51, पंढरपूर 59.04 मतदान झाले अशी मतदानाची टक्केवारी 59.19 टक्के इतकी झाली आहे.
सोलापूर लोकसभा मतदार संघाकडे महाविकास आघाडीची वर्णी लागण्याची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. अशातच दुपारच्या 12 च्या अपडेट्सनुसार सोलापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या तब्बल 16 हजारांनी आघाडीवर आहेत.
News Title- Solapur Loksabha Praniti Shinde
महत्वाच्या बातम्या-
हिमाचलमध्ये कंगना रनौतला धक्का; कॉँग्रेसचे विक्रमादित्य सिंह आघाडीवर
बारामतीत कांटे की टक्कर; पहिल्या फेरीत सुप्रिया सुळे आघाडीवर
भाजपने गुलाल उधळला; या उमेदवाराने फडकावला विजयाचा पताका