राज्यातील शिक्षक विनोद तावडेंना पुन्हा विद्यार्थ्यांच्या रांगेत बसवणार!

Vinod Tawade
शिक्षणमंत्री विनोद तावडे

सोलापूर | शिक्षण मंत्री जर म्हणत असतील शिक्षकांसाठी मंत्री झालो नाही तर राज्यातील शिक्षक त्यांना पुन्हा विद्यार्थ्यांच्या रांगेत बसवतील, असं म्हणत शिक्षक नेत्यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा समाचार घेतला.

सरकारनं शिक्षकाला भिकारी बनवलं, अधिकाऱ्यांना बदल्यांचा जीआर 7 महिने झाले तरीही समजत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करण्यात आली. त्याचबरोबर पुढील आंदोलन आझाद मैदानावर करण्याचा इशाराही दिला.

शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीतर्फे मोर्चा काढण्यात आला. जुनी पेन्शन योजना लागू करा, पगार 1 तारखेलाच द्या, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.