बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सैनिकहो तुमच्यासाठी!; देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा अभूतपूर्व सन्मान सोहळा

पुणे | पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यामधील आदर्शगाव करंदी मध्ये ‘करंदी वॉरियर्स’ ग्रुपच्या वतीने अतिशय स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. देशाच्या सेवेत कार्यरत तसेच माजी सैनिकांना सन्मान करण्यात आला.

श्री प्रदीप विनायक नप्ते आणि श्री राहुल गणपत कदम हे दोन सैनिक सेवानिवृत्त होताना या संधीचा औचित्य साधत हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मेजर जनरल संजय भिडे, निवृत्त कर्नल वसंत रामचंद्र बल्लेवार, निवृत्त कर्नल गिरिधर कोले, कर्नल सुरेश पाटील, लेफ्टनंट कर्नल लक्ष्मणराव साठे, लक्ष फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा प्रभुदेसाई, मेजर सुभाष ससाणे, आनंद ठाकूर, कार्याध्यक्ष ग्रीन थंब फाउंडेशन, माजी सैनिक संघटना श्री शामराव धुमाळ, पुणे जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते.

वरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार करंदी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच आणि पोलीस पाटील यांच्याकडून पार पडला. या सर्व कार्यक्रमाचे संपूर्ण तळागाळातील लोकांकडून कौतुक होत आहे.

दरम्यान, या कार्यक्रमामुळे करंदी वॅारियर्स ग्रुपचंही चांगलंच कौतुक होत आहे. या ग्रुपने कोविड काळातही खूप चांगलं काम केल्यानं अनेकांना वेळेत मदत मिळू शकली होती.

थोडक्यात बातम्या – 

‘हे ही दिवस जातील, अपना टाईम भी आयेगा’, पवारांवरच्या छापेमारीवर संजय राऊत म्हणाले…

MI vs SRH: प्ले-ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी मुंबईला खेळावी लागणार अफलातून खेळी

मुंबईकरांनो सावधान! कोरोना रुग्णांची पुन्हा होतीये झपाट्याने वाढ

अजित पवार आयकर विभागाच्या रडारवर; आतापर्यंत कुठे कुठे पडल्या धाडी?

देशातील सक्रिय कोरोना रूग्णसंख्येत 205 दिवसातील निच्चांकी नोंद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More