बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

CISF जवानांनी वाचवले तरूणीचे प्राण, झालं असं की…; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरूणी उंच ठिकाणावरून उडी मारत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ अक्षरधाम मेट्रो स्थानकावरील आहे. जीव देण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरूणीचे प्राण वाचवण्यात आले आहेत.

मेट्रो स्थानकावर 40 फुट उंचीवरून तरूणीनं उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळी 7.30 च्या सुमारास तरूणी उंचीवर गेल्याचं उपस्थित सीआयएसएफच्या जवानांच्या लक्षात आलं. त्यानंतर लगेचच जवानांनी इतर व्यक्तींच्या मदतींनं तरूणीचे प्राण वाचवले आहेत.

तरूणीला वरच्या मजल्यावर काही सुरक्षा रक्षक बोलण्यात गुंतवत होते तर खाली काही जवानांनी तिला वाचवण्याची तयारी केली होती. तिनं उडी मारल्यावर खाली उपस्थित जवानांनी लगेच तिला एका ब्लॅंकेटमध्ये झेललं. परिणामी त्या तरूणीचे प्राण वाचले आहेत.

दरम्यान, सीआयएसएफच्या ट्विटर खात्यावरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या या व्हिडीओला सर्वजण शेअर करत आहेत.

पाहा व्हिडीओ-


थोडक्यात बातम्या – 

राज ठाकरेंचा सरकारला अल्टीमेटम! गृहमंत्री वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“माफ करा बाबासाहेब… आमची लायकीच नाही”; हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

“मी महाराष्ट्राला वचन देतो की…”; सोमय्यांचं ठाकरे सरकारला ओपन चॅलेंज

“…हा तर राष्ट्रवादीचा ट्रॅक रेकाॅर्ड”; फडणवीसांची शरद पवारांवर घणाघाती टीका

“शरद पवार जातीवादी नाहीत”; पवारांवर केंद्रीय मंत्र्याची स्तुतीसुमनं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More