बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जवानानं धावत्या रेल्वेतून कोसळणाऱ्या प्रवाशाचे वाचवले प्राण, रेल्वेमंत्र्यांकडून कौतुकांचा वर्षाव

मुंबई | रेल्वे स्थानकावर अनेक धक्कादायक घटना घडत असतात. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो तर काहीजण थोडक्यात बचावले जातात. अशीच काहीशी घटना सध्या मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर घडल्याचं समोर आलं आहे.

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर उत्तरप्रदेश महानगरी एक्सप्रेस सकाळी 11.08 वाजण्याच्या सुमारास दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6वर आली. ही रेल्वे स्टेशन सोडून निघालीच होती की रेल्वेमधून एक वृद्ध माणूस कोसळून पडला. या सर्व घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत रेल्वेमंत्र्यांनी त्या वृद्धाचे प्राण वाचवणाऱ्या आरपीएफ जवान उमेश माळी यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं, मला आरपीएफ कर्मचाऱ्यावर गर्व आहे ज्याने तात्काळ धाव घेत प्रवाशाचे प्राण वाचवले.

दरम्यान, रेल्वेतून कोसळलेला प्रवासी विजय पटेल रेल्वेखाली जाणार इतक्यात रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या आरपीएफ जवान उमेश माळी यांनी त्यांच्याकडे धाव घेत त्यांचे प्राण वाचवले.

 

थोडक्यात बातम्या –  

रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा मैदानात! अमेरिकन पाॅप स्टार ब्रिटनी स्पीअर्सच्या स्वातंत्र्यची मागणी

कोरोनाच्या घातक डेल्टा प्लस विषाणूने या जिल्ह्यात पहिला बळी; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

“अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांचीही सीबीआयने चौकशी करावी”

पुणेकरांना दिलासा नाहीच; सोमवारपासून ‘हे’ निर्बंध लागू

पुणेकरांसाठी खुशखबर! बहुप्रतिक्षीत ‘स्पुटनिक वी’ लस ‘या’ तारखेपासून मिळणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More