लोकशाही पद्धतीनं आंदोलन करणाऱ्या निवृत्त सैनिकांचे तंबू उद्ध्वस्त

नवी दिल्ली | ‘एक वेतन, एक श्रेणी’ या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या माजी सैनिकांचे जंतर मंतर मैदानावरील तात्पुरते निवारे आणि तंबू पोलिसांनी जमीनदोस्त केलेत.

दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर आंदोलन आणि धरणं करण्यास परवानगी देऊ नये, असा आदेश काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय हरीत लवादाकडून देण्यात आला. त्या आदेशानुसार पोलिस प्रशासनाने कारवाई केल्याचं समजतंय.

2 वर्षांपासून निवृत्त सैनिकांचं येथे आंदोलन सुरू होतं, मात्र राष्ट्रीय हरित लावादाने 5 ऑक्टोबरला जंतरमंतरवर कोणत्याही आंदोलनासाठी  परवानगी न देण्याचे जारी केले, त्यानुसार तेथे कारवाई केली.