बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Weather Update! राज्यात ‘या’ जिल्ह्यात येणार उष्णतेची लाट

मुंबई | राज्यात आता अनेक ठिकाणी उष्णता वाढत असल्याचं अनुभवायला मिळत आहे. तापमानात वाढ होत असल्यानं नागरिकांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. मध्य आणि वायव्य भारतात वेगवान वारे वाहत आहेत.

राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात बहूतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशसेल्सियस पेक्षा अधिक नोंदवला गेला आहे.

अहमदनगर, जालना, औरंगाबाद, जळगाव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 29 ते 30 मार्चे रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, राज्यात काही भागात उष्णता वाढणार आहे तर काही भागांमध्ये उष्णतेची दाहकता कमी होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या – 

The Kashmir Files करमुक्त करण्यावर आदित्य ठाकरे म्हणतात…

‘जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मी नाही तर…’; एलोन मस्कचं मोठं वक्तव्य

RRR Day 2 Collection! दुसऱ्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

“…अन् मी बसल्या बसल्या अजित पवारांना पत्र लिहिलं”

“उद्धव ठाकरे भाग्यवान माणूस, मला त्यांची कुंडली पहायची आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More