नवी दिल्ली | काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना गळाला लावल्यानंतर आता भाजपकडून गुजरातमध्येही आमदारांची फोडाफोडी केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री काँग्रेसने आपल्या 14 आमदारांना जयपूरला हलवलं आहे. त्यांना जयपूरच्या शिवविलास हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. येत्या 26 तारखेला राज्यसभेची निवडणूक होत आहे.
काँग्रेसच्या आमदारांकडून भाजपच्या उमेदवाराला क्रॉस व्होटिंग होऊ शकते. मध्य प्रदेशातील राजकीय उलथापलाथीनंतर हा धोका आणखीनच वाढला आहे. त्यामुळे गुजरातमधील काँग्रेसचे नेते कमालीचे सतर्क झाले आहेत. याविषयी काँग्रेस आमदार हिंमत सिंह पटेल यांनी म्हटलं की आमच्या पक्षात सर्वकाही ठीक आहे. प्रत्येक पक्षाची रणनीती असते. काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये येणं हा रणनीतीचाच एक भाग असल्याचं पटेल यांनी सांगितलं.
सध्याच्या घडीला राजस्थान हे काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित राज्य मानले जात आहे. त्यामुळे राजकीय संकटावेळी काँग्रेसच्या आमदारांना राजस्थानमध्ये हलवण्यात येते. गेल्यावर्षी महाराष्ट्रातील सत्तानाट्यावेळी काँग्रेस आमदारांनाही जयपूरमध्येच ठेवण्यात आलं होतं.
येत्या 26 तारखेला राज्यसभेची निवडणूक होत आहे. गुजरातमध्ये राज्यसभेच्या चार जागांवर निवडणूक होणार आहे. गुजरात विधानसभेतील संख्याबळानुसार भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळेल. मात्र भाजपकडून नरहरी अमीन यांना तिसरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवण्यात आलं आहे.
Rajasthan: Some Gujarat Congress MLAs have reached Jaipur. MLA Himmatsinh Patel says, “Everything is alright. Every party has some strategies, this is a part of that.” https://t.co/m12WNtyMH7 pic.twitter.com/pPraRlQxNR
— ANI (@ANI) March 14, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“विधान परिषेदसाठी माझी तयारी…फक्त पाटलांच्या निर्णयाची वाट पाहतोय”
“हा निर्णय म्हणजे आमचे हातपाय तोडले आणि आता पळायला सांगताय”
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता शहरातले मॉल्स देखील बंद राहणार!
‘चासकमान’साठी भूसंपादन चुकीच्या पद्धतीने; पवारांची पुनर्वसनमंत्र्यांशी चर्चा
#CoronaVirus : षटकार तर मारला आता चेंडू कोण शोधणार?
Comments are closed.